Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: स्मार्ट मीटरबाबत महावितरणचं मोठं स्पष्टीकरण; ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही

स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांच्या मनात अनेक शंका आणि गैरसमज निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांशी संवाद साधत स्मार्ट मीटर बसविण्यासाठी कोणावरही सक्ती केली जाणार नसून प्रत्येक शंकेचे समाधान केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 28, 2026 | 02:06 PM
Raigad News: स्मार्ट मीटरबाबत महावितरणचं मोठं स्पष्टीकरण; ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही

Raigad News: स्मार्ट मीटरबाबत महावितरणचं मोठं स्पष्टीकरण; ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही

Follow Us
Follow Us:
  • स्मार्ट मीटर बसविणे हे शासनाचे धोरण असून ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले.
  • स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची अचूक नोंद होते आणि चुकीच्या बिलिंगच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.
  • स्मार्ट मीटरबाबत तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी केली जाणार आहे.
रोहा: रोहा महावितरण उपविभागात स्मार्ट मीटर बसविण्याबाबत वीज ग्राहकांच्या मनात अनेक समज, गैरसमज आहेत. स्मार्ट मीटर बसविणे हे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे. आम्ही फक्त त्याची अंमलबजावणी करत आहोत. हे करत असताना आम्ही ग्राहकांचे पूर्ण समाधान होईल, असे त्यांच्या शंकाचे निरसन करू. तसेच याबाबतीत ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याबाबत कोणतीही सक्ती करणार नाही, असे आश्वासन वीज वितरण रोहा उपविभाग कार्यकरी अभियंता प्रदीप डाळू यांनी ग्राहकांना दिले.

Hit and Run Video: ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार; काशीमीरा पोलिसांनी चालकाला वाहनासह घेतले ताब्यात

रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या जेष्ठ नागरिक सभागृह येथे महावितरणतर्फे आयोजित ग्राहक समाधान शिबिरात उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. केंद्र शासनाच्या वीज वितरण क्षेत्रातील आधुनिकीकरणाच्या धोरणांतर्गत देशभरात टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे.

पारंपरिक मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटर हे अधिक अचूक, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख तंत्रज्ञान असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. स्मार्ट मीटरमुळे जास्त वीज बिल येत असल्याच्या चर्चा अधूनमधून होत असल्या, तरी आजपर्यंत बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरबाबत अत्यल्प तक्रारी प्राप्त झाल्या असून प्राप्त प्रत्येक तक्रारीची संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करूनच पडताळणी केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (फोटो सौजन्य – AI Created)

स्मार्ट मीटरचे ‘हे’ फायदे

  • वीज वापराची अचूक आणि पारदर्शक नोंद.
  • चुकीच्या रीडिंगमुळे होणारे वाद कमी.
  • मीटर घराच्या आत असला तरी प्रत्यक्ष रीडिंग घेण्याची गरज नाही.
  • वेळोवेळी वीज वापराची माहिती मिळते.

पारंपरिक मीटर व स्मार्ट मीटरमध्ये नेमका फरक काय?

पूर्वीच्या पारंपरिक मीटरमध्ये वीज वापराची नोंद घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ग्राहकांच्या घरी जाऊन रीडिंग घ्यावे लागत असे. अनेक वेळा मीटर घराच्या आत असल्याने रीडिंग घेण्यात अडचणी येत, अंदाजे बिल दिले जात असे किया चुकीची नोंद होण्याची शक्यता निर्माण होत असे. याउलट स्मार्ट मीटरमध्ये वीज वापराची माहिती थेट आणि अचूक पद्धतीने प्रणालीमध्ये नोंदविली जाते. त्यामुळे मानवी चुका कमी होतात, चुकीचे रीडिंग येण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येते आणि ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची अद्ययावत माहिती उपलब्ध होते.

‘एल निनो’मुळे बिलावर परिणाम

वीज वापरात वाढ होण्यामागे केवळ मीटर कारणीभूत नसून, यंदा ‘एल निनो’ या हवामान बदलाच्या परिणामामुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे एसी, कुलर, पंखे, फ्रिज आदी विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने वीज वापरही वाढला असून, त्याचा परिणाम बिलावर दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण; तक्रारदाराचाच यू-टर्न?

तक्रार आल्यास प्रत्यक्ष पडताळणी करणार

स्मार्ट मीटर संदर्भात एखाद्या ग्राहकाची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित अधिकाऱ्याऱ्यांकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन मीटरची तपासणी, वीज वापराची घडताळणी आणि तांत्रिक परीक्षण केले जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची शंका असल्यास ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृतपणे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Msedcl clarifies smart meter installation no compulsion for consumers benefits and complaint process explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

भारतात पहिल्यांदाच नोंद! आसामच्या दिब्रू-सैखोवा जंगलात सापडली गांधीलमाशीची दुर्मिळ प्रजाती
1

भारतात पहिल्यांदाच नोंद! आसामच्या दिब्रू-सैखोवा जंगलात सापडली गांधीलमाशीची दुर्मिळ प्रजाती

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ
2

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
3

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार
4

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.