Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Goa Highway : महामार्गावर भीषण अपघात; गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनाचा स्फोट

मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचं सत्र कायमच सुरु असतं. यात आणखी भर म्हणजे गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनाला आग लागल्याने भीषण अपघात झाला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 22, 2026 | 12:50 PM
Mumbai Goa Highway : महामार्गावर भीषण अपघात; गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनाचा स्फोट
Follow Us
Close
Follow Us:
  • महामार्गावर भीषण अपघात
  • गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनाचा स्फोट
  • अग्नीशमन दलाच्या प्रसंगावधामुळे अनर्थ टळला
पेण : मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचं सत्र कायमच सुरु असतं. यात आणखी भर म्हणजे गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनाला आग लागल्याने भीषण अपघात झाला. पेण नगरपालिका हद्दीत हा अपघात घडला असून दोन्ही बाजूची वाहतूक कोंडी झाली.महामार्गावर पेण तालुक्यातील वाशी- उंबर्डे फाटा येथे ही घटना घडली आहे.

गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या एका वाहनाला आग लागली. या घटनेत कुठलीहीजिवित हानी झाली नसली तरी अपघातग्रस्त वाहन जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पेण नगरपालिका आणि जेएसडब्ल्यू कंपनीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. गॅस सिलेंडरचा फोटो होण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पेण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

देवदूत ठरले RPF जवान! ऑपरेशन जीवन रक्षा आणि मातृशक्ती अंतर्गत वाचवला प्रवाशाचा जीव, धावत्या ट्रेनमध्ये केली सुरक्षित प्रसूती

प्रसंगावधान राखत अग्नीशामन दलाने वेळीच आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मुंबई गोवा महामार्गावर कुठेना कुठे अपघात हे होतच आहेत. कधी रस्त्यांची झालेली दुर्दशा तर वाहतूक कोंडी यामुळे दिवसेंदिवस हा महामार्ग मृत्यूचा सापळा होत आहे.

अपघात टाळण्यासाठी या महामार्गावर काही विकासकामं करण्यात येणार होती. मात्र काही ना काही कारणांनी ते लांबणीवर जात आहे. मुंबई ते गोवा हा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६६) फोरलेन करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्याचा लागणारा 12 ते 13 तासांचा प्रवास अवघ्या 6 तासांत होणार आहे. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने विविध अडथळ्यांमुळे कामाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं समोर आलं आहे. पनवेल ते सिंधुदुर्ग (Mumbai Goa Highway)असा सुमारे466 किलोमीटरचा हा महामार्ग कोकणातील पर्यटन, व्यापार आणि दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पनवेल ते इंदापूर हा टप्पा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचआए) विकसित केला जात असून उर्वरित भाग केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारित आहे. प्रकल्पाला मुख्य अडथळे इंदापूर दरम्यान सुमारे ३ किलोमीटर व माष्णगाव येथे सुमारे 7 किलोमीटर लांबीच्या बायपास रस्त्यांमुळे निर्माण झाले आहेत.

कभी थंडी तो कभी…; Pune शहरात तापमानाची स्वतःशीच स्पर्धा; चढ-उतार कायम

बायपास अभावी चालकांना सतत सावधगिरी बाळगावी लागत असल्याने प्रवास अचिक त्रासदायक ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 फ्लायओव्हर मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून इंदापूर आणि माणगाव बायपासचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. जरी एकूण प्रकल्पाची मुदत 2026 अशी निश्चित करण्यात आली असली, तरी सद्याद्यस्थितीत आणखी विलब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी नवीन टेंडर प्रक्रिया आणि पर्यायी उपाययोजना सबवण्याचे प्रधान सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल आहे. लवकरच हा महामार्ग सुरक्षित, सुकर आणि जलद प्रवासाचा पर्याय बनेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Mumbai goa highway fatal accident vehicle carrying gas cylinder explodes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Accident Case
  • Mumbai Goa Express Way

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.