पुण्यात थंडी वाढणार (फोटो- istockphoto)
पुण्यात हवामानात सातत्याने बदल
नागरिकांना संमिश्र वातावरणाचा अनुभव
पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर
पुणे:पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून नागरिकांना संमिश्र वातावरणाचा अनुभव येत आहे. बुधवारी (दि. २१) तापमानातील मोठ्या चढ-उतारामुळे सकाळी गारवा तर दुपारनंतर तीव्र उन्हाचा चटका जाणवला. रात्री आणि पहाटेच्या वेळी हवेत गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर तापमान वाढल्याने उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. काही भागांत दमट वातावरणही जाणवले. बुधवारी पुणे आणि परिसरात किमान तापमान १३.३ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
पहाटेच्या सुमारास काही ठिकाणी विरळ धुके दिसून आले, मात्र दिवसभर आकाश निरभ्र राहिले. सकाळी वातावरण आल्हाददायक असले तरी दुपारनंतर वाढलेल्या उन्हामुळे नागरिकांची गैरसोय झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी (दि. २२) किमान व कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून किमान तापमान सुमारे १४ अंश, तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांत आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून सकाळच्या वेळी विरळ धुक्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Pune Weather: हा खेळ हवामानाचा ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस गारठा…; कसे असणार वातावरण?
पुण्यनगरीत पुढील दोन दिवस गारठा
शहर व परिसरात मागील काही दिवसांत कमाल तापमानात वाढ दिसून येत असली, तरी किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. मंगळवारी शहराचे किमान तापमान १२.५ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. पहाटे व सायंकाळी हवेतील गारवा जाणवत असून दुपारच्या वेळी मात्र वाढलेल्या कमाल तापमानामुळे कडक उन्हाचा चटका बसत आहे. त्यामुळे पुणेकरांना सध्या थंड व उष्ण अशा संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे.
हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारी (ता. २१) किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहणार असून कमाल तापमानात एक अंशांची घट होऊन ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, तर सकाळच्या वेळेत विरळ धुके पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहणार असून कमाल तापमानात एक अंशांची घट होऊन ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, तर सकाळच्या वेळेत विरळ धुके पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.






