Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: नेरळ साकव पुलाचे काम अर्धवट; सुरक्षा कठडे नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात, ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप

नेरळमधील साकव पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका चारचाकी वाहनाचा अपघात थोडक्यात टळल्यानंतर ठेकेदाराच्या कामकाजावर आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 31, 2026 | 03:00 PM
Raigad News: नेरळ साकव पुलाचे काम अर्धवट; सुरक्षा कठडे नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात, ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप

Raigad News: नेरळ साकव पुलाचे काम अर्धवट; सुरक्षा कठडे नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात, ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप

Follow Us
Follow Us:
  • नेरळमधील अर्धवट साकव पुलावर सुरक्षा कठडे नसल्याने चारचाकी वाहनाचा मोठा अपघात थोडक्यात टळला.
  • पुलाच्या दोन्ही बाजूची खडी पावसात वाहून गेल्याने दुचाकी वाहनांचीही ये-जा धोकादायक झाली आहे.
  • अपूर्ण काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून तातडीने पूल पूर्ण करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
कर्जत: नेरळ ग्रामपंचायत हद्दीत नेरळ विकास प्राधिकरणाकडून साकव पूल बनवला गेला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला टाकण्यात आलेली खडी पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहे तर ठेकेदाराने अधिकारी वर्गाच्या डोळ्यात धूळफेक करीत पुलाला कठडे बांधले नाहीत. दुचाकी देखील त्या पुलावरून जात नाही आणि आज अचानक तेथे चार चाकी वाहनाचा अपघात होता होता वाचला आहे. त्यामुळे ही स्थिती उद्भवल्याचे स्थानिकांचे मत आहे.

Bhiwandi Building Collapsed: भिवंडी दुर्घटनेवर सरकार ॲक्शन मोडमध्ये! दोषींवर कठोर कारवाईचे आदेश, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

नेरळ येथील रजिस्टर ऑफिसच्या बाजूने समर्थ मठ आणि शंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून असल्याने गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक मोठा अपघात घडता घडता राहिला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली तरी प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि ठेकेदाराचा निष्काळजीपणा त्या पुलाचे बांधकाम करताना दिसून आला आहे. या पुलाच्या कामासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बांधकाम विभागाला २६ मार्च २०२५ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी पत्र पाठवले होते. तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या उप अभियंत्यांनीही १९ सप्टेंबर २०२५ रोजी या कामासाठी निधी मंजूर करण्याची शिफारस केली होती आणि ती निधीमधून काम पूर्ण करण्यात आले आहे.

अर्धवट पूल कामाची चौकशी करण्याची होतेय मागणी!

या पुलाचे काम अर्धवट ठेवून ठेकेदार कामाचे बिल काढून गायब झाला आहे. पुलाच्या स्लॅबचे दोन्ही बाजूला टाकण्यात आलेली खडी पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहे. त्यात पुलाला सुरक्षा कठडे देखील बांधले नाहीत. त्या स्थितीत स्थानिक वाहनचालक यांच्याकडून प्रवास सुरू होता, मात्र पावसाळ्यात खडी वाहून गेल्याने आता दुचाकी वाहन देखील तेथून जात नाही. गुरुपौर्णिमादिनी नेरळ येथील समर्थ मठाकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ होती.

या दरम्यान, पुलाचे काम अपूर्ण व संरक्षण भिंत किवा सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्याने एका चारचाकी वाहनाचे चाक रस्त्यावरून थेट नाल्याच्या कडेला घसरले. सुदैवाने उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखून चालकाला व वाहनाला सुरक्षित बाहेर काढले, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार या ठिकाणी पाईप साकवाऐवजी आर. सी.सी. स्लॅब साकव मंजूर करण्यात आले होते. पण तेथे देखील ठेकेदाराने चुना लावण्याचे काम केले असून या कामाची चौकशी करा मागणी केली जात आहे.

पावसाळ्यात सावध राहा! आर्द्र हवामानामुळे विषाणूजन्य आजारांचा धोका, चार आजारांतील वाढीची सरासरी ५७.६ टक्क्यांवर…

संबंधित ठेकेदाराला किंवा प्रशासनाला तात्काळ हे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे आदेश दिले जावेत, नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या निष्काळजी ठेकेदारावर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी तसेच काम पूर्ण होईपर्यंत अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी बॅरिकेट्स आणि इशारा फलक लावावेत. – बंटी शिर्के, मठाचे सेवेकरी

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Neral half built bridge sparks safety concerns villagers demand probe against contractor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
1

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
2

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
3

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
4

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.