Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

मानवाधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांनी २८ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला नेरळ गावातील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था यांनी पाठिंबा दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 30, 2026 | 03:17 PM
Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Follow Us
Follow Us:
  • उपोषणाला नेरळ गावातील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांचा पाठिंबा
  • नेरळ पोलीस आणि नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक वगळता कोणत्याही शासकीय कार्यालयाने उपोषण स्थळी भेट दिलेली नाही
  • मानवाधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांचे २८ सप्टेंबरपासून उपोषण सुरू
कर्जत: नेरळ गावातील रहिवासींचे नागरी प्रश्न आणि राज्यमार्ग रस्त्याबाबतचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुरू असलेले उपोषण दुसऱ्या दिवशी कायम आहे. या उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून निर्णय घ्यावा यासाठी एकही अधिकारी उपोषणस्थळी पोहचलेला नाही. दरम्यान सरकारी अधिकाऱ्यांचा असहकार या उपोषणकत्यांच्या बाबत दिसत असून शासकीय अधिकाऱ्यांच्या या भूमिकेबाबत संताप नेरळ ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

नेरळ ग्रामपंचायतीमधील अनागोंदी कारभार, अतिक्रमणे, नगरपरिषद होणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पबाबत प्रश्न, डंपिंग ग्राउंड परिसरातील जमिनीची विक्री, कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्याच्या आजूबाजूचे अतिक्रमण, नेरळमधील व्यापारी संकुलाची गाळेवाटप आणि नेरळ गावातील रस्त्यावरील फुटपाथावरील अतिक्रमण आदी विविध १३ प्रश्न घेऊन मानवाधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांनी २८ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

सर्व राजकीय पक्षांचा पाठिंवा

उपोषणाला नेरळ गावातील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था यांनी पाठिंबा दिला आहे. त्यात नेरळ मैत्री ग्रुप, आझाद समाज पार्टी, युवा नवरात्रोत्सव मंडळ, कर्जत तालुका आगरी समाज संघटना, हुतात्मा स्मारक समिती, कर्जत प्रेस क्लब, कर्जत प्रेस असोसिएशन, मानवाधिकार आयोग संघटना, नेरळ विकास संघर्ष समिती, माहिती अधिकार सामाजिक समूह, ज्ञानमाता सामाजिक संस्था, नेरळ व्यापारी फेडरेशन, नेरळ लोहाना समाज, अँटी करप्र्शन बोर्ड, नेरळ टॅक्सी संघटना, किसान क्रांती संघटना, नेरळ माथेरान टॅक्सी संघटना यांच्यासह शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस, आरपीआय आठवले गट आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

नेरळमध्ये शासकीय कार्यालयाच्या विरोधात संताप

हे उपोषण कर्जत पंचायत समिती, नेरळ ग्रामपंचायत, नेरळ विकास प्राधिकरण, तहसीलदार कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत असलेल्या विषयांशी निगडीत आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता यांनी उपोषणस्थळी येऊन मार्ग काढण्यासाठी येणे आवश्यक असताना कोणत्याही प्रकारची खबरदारी प्रशासन घेत नसल्याने नेरळमध्ये शासकीय कार्यालयाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांसह आरोग्य पथक वगळता कुणीचीही भेट नाही

नेरळ पोलीस आणि नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक वगळता कोणत्याही शासकीय कार्यालयाने उपोषण स्थळी भेट दिलेली नाही. पोलीस अधिकारी कर्मचारी है बंदोबस्ताचा भाग म्हणून तेथे पोहचले होते. तर उपोषणकर्ते गोरख शेप यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी आरोग्य केंद्राचे डॉक्टर कर्मचारी तेथे पोहचले होते. मात्र उपोषण जे प्रश्न घेऊन सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी एकही अधिकारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रश्नावर कसा मार्ग काढला जाईल यासाठी पोहचलेले नाहीत.

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

आपल्यावर जरी बायपास शस्त्रक्रिया आलेली असली तरी आपण गावच्या विकासाच्या बाबतीत आग्रही आहोत, आपण कोणीही माझ्या प्रकृतीचा बाऊ करू नये आणि मला उपोषण सोडण्याची सूचना करू नये. मी उपोषण करताना जीवनाच्या अंतापर्यंत उपोषण करण्याच्या आधीच जाहीर केले आहे. – गौरख शेप, मानवाधिकार कार्यकर्ते

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Neral protest 13 demands fasting continues second day officials absent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Karjat
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
1

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
3

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत
4

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.