पेणमध्ये विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; दसऱ्यानिमित्त महाविद्यालयाला दिली अनोखी भेट
रायगड , किरण बाथम :- “झाडं लावा, झाडं जगवा” हा आता फक्त एक सामाजिक विचार राहीला नाही, तर काळाची गरज झाली आहे.अजूनही देशात पर्यावरणाच्या बाबतीत पाहिजे तितकी जनजागृती झालेली नाही. हीच बाब लक्षात घेत पेण तालुक्यातील ज्युनिअर महाविद्यालय जोहे येथील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कॉलेजला फुलझाडं भेट दिली. प्राचार्य गलांडे यांच्या नेतृत्त्वाखाली विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रागंणात वृक्षारोपण केले. या वृक्षारोपण उपक्रमात विद्यार्थ्यांसोबतच प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गदेखील सहभागी झाले होते.
हेही वाचा- राज्यात विजयादशमीसाठी पाऊस देखील हजेरी लावाणार, महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावासाचा अंदाज
न्यू इंग्लिश स्कुल आणि आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स ज्युनिअर कॉलेज जोहे विद्या संकुलनात इयत्ता 11 वी 12 वी आर्टस् च्या विद्यार्थ्यांकडून फुलझाडांची रोपे कॉलेजचे प्राचार्य यू.एस.गलांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते कॉलेजच्या प्रांगणात फुलझाडांची लागवड करत वृक्षारोपण करण्यात आले व सदर फुलझाडांचे संगोपन व दररोज पाणी देण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवरच देण्यात आली. मुलांनी महाविद्यालयाला दिलेल्या या अनोख्या भेटीमुळे प्राध्यापक आणि महाविद्यालयाच्या वरिष्ठांकडून या मुलांचं कौतुक केलं जात आहे.
हेही वाचा- कल्याणमध्ये राजकीय वादाची ठिणगी, ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला गालबोट
यावेळी प्राचार्य गलांडे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “जहाँ है हरियाली, वहाँ है खुशहाली”. निसर्ग व पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्व विदयार्थी व प्राध्यापकांनी एकत्रितपणे कार्य केले पाहिजे.विजयादशमी हा दिवस शुभ मुहुर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी अनिष्ठ रुढी परंपरा आणि अन्यायाविरुद्ध होणारा विजय दिन म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. पर्यावरणावरणाचा होणारा ऱ्हास, प्रदुषण आणि अतिक्रमण यांच्या विरोधात सीमोल्लंघन करत पर्यावरण वाचवण्यासाठी मुलांनी हा स्तुत्य उपक्रम केला आहे.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या या महत्त्वपूर्ण भेटीबद्दल प्रचार्यांनी मुलांचं कौतुक केलं आहे. मुलांना मार्गदर्शन करत ते म्हणाले की, आपण सर्वांनी मिळून एकत्रित येत पर्यावरण वाचवलं तरच निसर्ग आपल्याला वाचवू शकतो. आपण झाडं लावली, नदी, समुद्र आणि खाड्यांवर होणारं बेकायदेशीर अतिक्रमण तसंच प्रदुषणयुक्त पाण्यापासून नदी,नाले, समुद्र यांना नाचवलं तर सागरी संपत्ती टिकून राहीन आणि तरच आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. निसर्ग माणसाचा मित्र आहे, मात्र स्वार्थापायी माणसाने निसर्गाचा ऱ्हास केला. पर्यावरण टिकलं तर माणसं टिकतील आणि तरंच देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल. त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या घरा शेजारी, गावात व परिसरात सुद्धा वृक्षारोपण केले पाहिजे,असं माहाविद्यालयाच्या प्रचार्य़ांनी सांगितलं. तसंच पर्यावरण विषयी माहिती देत सदर उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक प्राचार्यांनी केले.