Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: धरणासाठी जमीन दिली, पण हक्क नाहीत; पाली-भूतीवली धरणग्रस्तांचा न्यायासाठी लढा, महसूल मंत्र्यांकडे निवेदन

रायगड जिल्ह्यातील पाली-भूतीवली धरण प्रकल्पाला सुमारे ४० वर्षे उलटूनही अनेक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत भूसंपादन, नुकसानभरपाई, पुनर्वसन आणि भूभाड्यासह विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 04, 2026 | 12:07 PM
Raigad News: धरणासाठी जमीन दिली, पण हक्क नाहीत; पाली-भूतीवली धरणग्रस्तांचा न्यायासाठी लढा, महसूल मंत्र्यांकडे निवेदन

Raigad News: धरणासाठी जमीन दिली, पण हक्क नाहीत; पाली-भूतीवली धरणग्रस्तांचा न्यायासाठी लढा, महसूल मंत्र्यांकडे निवेदन

Follow Us
Follow Us:
  • पाली-भूतीवली धरण प्रकल्पग्रस्तांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.
  • कालव्यांसाठी घेतलेल्या जमिनींचे भूसंपादन, नुकसानभरपाई आणि सुमारे २५ वर्षांचे भूभाडे देण्याची मागणी करण्यात आली.
  • प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्याचीही संघर्ष समितीची मागणी आहे.
कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्टा हिरवागार करण्यासाठी पाळी भूतीवली येथे धरण बांधण्यात आले. या धरणासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून कोणत्याही सोयी सुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे पाली भूतीवली प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन भूसंपादन, नुकसानभरपाई आणि पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. शासनाने आता विलंब न करता प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी देखील संघर्ष समितीने केली आहे.

Raigad News: शिक्षण ते समाजसेवा! पनवेलमध्ये ‘संकल्प’ संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण; नागरिकांना जोडणार एक नवे व्यासपीठ

रायगड जिल्ह्यातील पाती-भूतिवती धरण प्रकल्पाला सुमारे ४० वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. इतका मोठा कालावधी लोटूनही प्रकल्पाशी संबंधित अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित असून हजारो शेतकरी, भूमालक आणि प्रकल्पग्रस्त कुटुंबे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.सुमारे २५ वर्षांपूर्वी कालव्यांची कामे करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीतून कालवे काढण्यात आले; मात्र आजतागायत त्या जमिनींचे भूसंपादन पूर्ण झालेले नाही.

अनेक ठिकाणी भूसंपादनाचा प्रस्ताव तयार असूनही त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. परिणामी शेतकरी स्वतःच्या जमिनीचा पूर्ण उपयोग करू शकत नाहीत आणि शासनाकडून त्यांना कोणतेही भूभाडे अथवा आर्थिक लाभ मिळालेले नाहीत. याशिवाय पुनर्वसित गावठाणांच्या हद्दी, क्षेत्रफळ, अधिकृत नकाशे व अभिलेख याबाबत महसूत विभाग आणि भूमी अभिलेख विभागाकडे संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याचे समोर येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे नागरिकांचे अनेक प्रशासकीय व कायदेशीर प्रश्न प्रलंबित राहिले आहेत.

याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन पाली भूतीवली धरण संघर्ष समितीने निवेदन दिले. शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष मंगेश गायकर आणि सचिव सचिन गायकवाड यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदन म्हटलं आहे की, पाली-भूतिवली धरण प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. कालव्यांसाठी वापरण्यात आलेल्या सर्व जमिनींच्या भूसंपादनाचा प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावा. संबंधित सर्व शेतकऱ्यांना मागील सुमारे २५ वर्षाचा प्रलंबित भूभाडा, त्यावरील कायदेशीर व्याजासह आणि लागू असलेले सर्व आर्थिक लाभ तात्काळ अदा करण्यात यावेत.

Amravati News: अप्पर वर्धा धरणात ५०.४१ टक्के जलसाठा! पावसाची प्रतीक्षाच; चंद्रभागा पूर्णा धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू

कालव्यांच्या भूसंपादनाची सर्व प्रकरणे निश्चित कालमयदित निकाली काढण्यात यावीत.प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांना पर्यायी जमीन देण्यात यावेत. पुनर्वसित पाली तर्फे वरेडी गावाच्या सुरक्षिततेची तज्ज्ञ समितीकडून चौकशी करून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. पुनर्वसित गावठाणांची हद्द, क्षेत्रफळ, नकाणे व अभिलेख तातडीने निश्चित करून अधिकृत नोंदी अद्ययावत करण्यात याव्यात. या प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रलंबित तक्रारींची चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, जलसंपदा, भूमी अभिलेख व प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करण्यात यावी. या संपूर्ण प्रकरणासाठी निश्चित कालमयदिचा कृती आराखडा जाहीर करण्यात यावा. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क, योग्य मोबदला, भूभाडा, पुनर्वसन आणि सुरक्षित जीवन आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Web Title: Pali bhutivali dam project affected farmers demand land acquisition compensation rehabilitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • Karjat
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश
1

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
2

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.