Raigad News: शिक्षण ते समाजसेवा! पनवेलमध्ये 'संकल्प' संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण; नागरिकांना जोडणार एक नवे व्यासपीठ
Satara News: कराडतून मोठा एल्गार! शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष आणखी तीव्र
समाजात शिक्षणाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने शिक्षिका वैशाली जगदाळे यांनी संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली. अल्पावधीतच संस्थेने शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक उत्तरदायित्व, पर्यावरण, सैनिकांविषयी कृतज्ञता आणि गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम उभे केले आहे. कोणत्याही शासकीय योजनेची वाट न पाहता समाजातील नागरिकांना सहभागी करून घेत सामाजिक उपक्रमांची प्रभावी चळवळ उभारण्यात संस्थेला यश आले आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
कोरोनाकाळात अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट आले होते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी संस्थेने शालेय पाठ्यपुस्तक आदान-प्रदान अभियान सुरू केले. एका विद्यार्थ्यांची पुस्तके दुसऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या या अभिनव संकल्पनेला पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पर्यावरण संवर्धनाबरोबरच पालकांचे लाखो रुपयांचे शैक्षणिक खर्च वाचले. आजही हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात सुरू असून अनेक कुटुंबांसाठी तो मोठा दिलासा ठरत आहे. शिक्षक दिनानिमित्त विशेष शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. महिला सक्षमीकरणालाही संस्थेने विशेष प्राधान्य दिले आहे.
मनसुख हिरेन हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; वाझे, शर्मांसह 10 जणांवर आरोप निश्चित
संस्थेच्या वाढत्या कार्याचा विस्तार आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकृत वेबसाईट विकसित करण्यात आली आहे. या वेबसाईटवर संस्थेची स्थापना, ध्येय उद्दिष्टे, विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम, सदस्य नोंदणी, कार्यक्रमांचे छायाचित्र संग्रह, आगामी उपक्रम, समाजहिताच्या योजना तसेच संस्थेशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे देश-विदेशातील नागरिक, माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि देणगीदार यांना संस्थेच्या कार्याशी जोडले जाणे अधिक सुलभ होणार आहे. यावेळी महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, अभिनेते पुष्कर श्रोत्री, पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उमा पारवे, ज्योती सोनार, संगीता कुंभार, सुनंदा गरड, स्वप्नील पाटील, प्रणव काळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.






