
Raigad News: अपक्षांमुळे बदलली राजकीय समीकरणे! निवडणूक झाली अधिक चुरशीची, राजकीय गणित बिघडणार?
Pune Election : एकपक्षीय राजवटीचा भाजपाचा डाव उधळून लावा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
कामोठे परिसरातील प्रभाग क्रमांक १२ ‘क’ आणि १३ मध्येही जागावाटपातून नाराज झालेल्या इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. पक्षांतर्गत असंतोष आणि चिन्हांच्या वाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे येथे स्वतंत्र लढती उभ्या राहिल्या आहेत. स्थानिक संपर्क आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा यामुळे या अपक्ष उमेदवारांनी या प्रभागांमध्ये प्रभावी आव्हान निर्माण केले आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
एकूणच पनवेल महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची वाढती संख्या प्रस्थापित पक्षांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. अनेक प्रभागांमध्ये थेट लढतींचे रूपांतर आता तिरंगी किंवा बहुकोनी लढतीत होत असून, याचा अंतिम निकालांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रभागात महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नसल्याने अपक्ष उमेदवारांना अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत असल्याची चर्चा आहे. तसेच प्रभाग क्रमांक ६ मध्येही पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्याने माजी नगरसेवकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे येथेही समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक ११ ‘क’ मध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती महिला आणि ओबीसी अशा आरक्षणाच्या जागा असल्याने येथे अनेक इच्छुक होते. जागावाटपात काही जागा आघाडीतील घटक पक्षांना दिल्या गेल्याने इतर इच्छुकांना संधी मिळू शकली नाही. यामुळे महाविकास आघाडीतून मशाल चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या अधिकृत उमेदवारांपुढे ट्रक, सफरचंद, कप बशी या अपक्षांची आव्हान आहे. त्यांनी सुद्धा जोरदार प्रचार केला असून महायुती आणि महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रभाग सध्या अपक्ष उमेदवारांमुळे विशेष चर्चेत आहे.
खांदा कॉलनीतील प्रभाग क्रमांक १५ मध्येही जागावाटपातून नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. या प्रभागात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात असतानाच अपक्ष उमेदवारही कप बशी चिन्हावर प्रभावीपणे मैदानात उतरल्याने येथे तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सामाजिक व धार्मिक उपक्रमांतून निर्माण झालेला जनसंपर्क या प्रभागात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.