Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahad ST Depot News: महाड एसटी आगारातील ‘शिवशाही’वर प्रवाशांचा संताप; सेवा बंद करण्याची मागणी

कोकणातील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती स्थान असलेल्या महाड एसटी आगारातील शिवशाही बस सेवेबाबत प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या नाराजीमुळे प्रवाशांनी शिवशाही बंद करण्याची मागणी केली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 02, 2026 | 11:33 AM
Mahad ST Depot News: महाड एसटी आगारातील ‘शिवशाही’वर प्रवाशांचा संताप; सेवा बंद करण्याची मागणी (फोटो-सोशल मीडिया)

Mahad ST Depot News: महाड एसटी आगारातील ‘शिवशाही’वर प्रवाशांचा संताप; सेवा बंद करण्याची मागणी (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सततच्या बिघाडामुळे शिवशाहीला ब्रेक
  • महाड आगारातून सेवा बंद होण्याचे संकेत
  • महाडकरांकडून या सेवेबाबत तीव्र असंतोष व्यक्त
 

Mahad ST Depot News: कोकणातील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती स्थान असलेल्या महाड एसटी आगारातील शिवशाही बस सेवेबाबत प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कालबाह्य व जिर्णावस्थेत गेलेल्या शिवशाही बसेस वारंवार रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी, महाडकरांनी या सेवेबाबत तीव्र असंतोष व्यक्त करत ती तातडीने बंद करण्याची मागणी पुढे केली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रमुख आगार म्हणून महाड आगार ओळखले जाते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण, खेड तसेच पुणे व सातारा या भागांतून येणाऱ्या अनेक एसटी बसेस मुंबईकडे किंवा कोकणात प्रवास करताना महाड येथे थांबतात. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांची ये-जा या आगारातून होत असते.

Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक

दरम्यान, शिवशाही सेवा बंद झाल्यानंतर त्याऐवजी नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार का, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागून आहे. महाडकरांच्या दैनंदिन प्रवासासाठी सुरक्षित, वेळेवर आणि सुविधायुक्त पर्याय उपलब्ध होणे हीच सध्याची सर्वांची अपेक्षा आहे. गाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. सध्या महाड आगाराकडे दहा शिवशाही बसेस कार्यरत आहेत. या बसेस मुंबई, पुणे आणि बोरिवली मार्गावर धावत आहेत.

मात्र या गाड्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून प्रवासादरम्यान वातानुकूलित यंत्रणा वारंवार बंद पडणे, इंजिन बिघाड होणे किंवा बस रस्त्यातच थांबणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. परिणामी, प्रवाशांना प्रवासात विलंब तर सहन करावाच लागतो, शिवाय अनेकदा बंद पडलेल्या शिवशाहीतून उतरून साध्या लालपरी एसटी बसने पुढील प्रवास करावा लागतो. शिवशाहीचे तिकीट दर तुलनेने जास्त असतानाही अपेक्षित सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांचा आर्थिक तोटा होत आहे. वातानुकूलित सेवा म्हणून घेतलेले तिकीट आणि प्रत्यक्षात मिळणारी सुविधा यात मोठी तफावत असल्याची भावना प्रवाशांत आहे. त्यामुळे ‘शिवशाही’ ही सेवा आता नावापुरतीच उरल्याची टीका होत आहे.

Karjat News : अपघाताचं सत्र संपता संपेना; कर्जत-कल्याण राज्यमार्गावर होतोय मृत्यूचा सापळा

याशिवाय, या बसेसच्या दुरुस्तीसाठी लागणारे आवश्यक सुटे भाग (स्पेअर पार्ट्स) वेळेवर उपलब्ध होत नसल्याने देखभाल कामात अडचणी निर्माण होत आहेत. वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे मेकॅनिकल विभागालाही या गाड्यांच्या दुरुस्तीचा मोठा ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक बोजा आणखी वाढून सोबतच प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Demand to stop shivshahi at mahad st depot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • Mahad
  • raigad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.