Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पेणमध्ये आदिवासींचा भव्य मेळावा; प्रलंबित दावे, वारस नोंदणी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी जोरदार मागणी

बरडावाडी येथे आदिवासींचा भव्य मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला पाबळ खोऱ्यातील वरप, पाबळ, जीणें, महाल मीरा डोंगर या चार ग्रामपंचायत क्षेत्रातील २९ वाड्यातील सुमारे ६०० च्या आसपास आदिवासी जमा झाले होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 25, 2026 | 02:10 PM
Raigad News: पेणमध्ये आदिवासींचा भव्य मेळावा; प्रलंबित दावे, वारस नोंदणी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी जोरदार मागणी

Raigad News: पेणमध्ये आदिवासींचा भव्य मेळावा; प्रलंबित दावे, वारस नोंदणी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी जोरदार मागणी

Follow Us
Follow Us:
  • चार वर्षांपासून प्रलंबित दावे निकाली काढण्यासह नवीन दावे स्वीकारण्याची मागणी आदिवासी प्रतिनिधींनी केली.
  • फार्मर आयडी आणि ई-केवायसी पूर्ण करून शासकीय योजनांचा लाभ मिळवण्याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन केले.
  • रायगडमधील १८ हजार आदिवासींना महसुली सातबारा देण्याच्या निर्णयाचे मेळाव्यात स्वागत करण्यात आले.
पेण: पेण उपविभागीय समितीकडे गेली चार वर्षे प्रलंबित असलेले दावे प्राप्त झालेल्या वैयक्तिक दावेदार व दळी धारक मयत व्यक्तींचे वारस नोंद, फार्मर आयडी व ई केवायसी मुळे शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने आदिवासींमध्ये असणारा असंतोष तसेच नवीन दावे करणे या प्रमुख मागण्यांच्या संदर्भात संस्थेने बरडावाडी येथे आदिवासींचा भव्य मेळावा आयोजित केला होता.

पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीचा वाद पेटला; सुनील टिंगरेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

खुमा तानाजी द्वारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला पाबळ खोऱ्यातील वरप, पाबळ, जीणें, महाल मीरा डोंगर या चार ग्रामपंचायत क्षेत्रातील २९ वाड्यातील सुमारे ६०० च्या आसपास आदिवासी जमा झाले होते. त्यानंतर संस्थेने पाबळ खोरे या दुर्गम खोऱ्यात तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर राव यांना पाबळ खोऱ्यात बरडावाडी येथे आणून त्यांच्या हस्ते दळी जमिनीचे पट्टे व सामूहिक वन हक्काचे पट्टे वाटप केले.

यामुळे सुमारे येथील दहा गावे व २९ वाड्यांना वनउपज घेण्याचे अधिकार प्राप्त झाले. या प्राप्त झालेल्या वन जमिन धारकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येकाला ही केवायसी व फार्मर आयडी काढणे गरजेचे आहे. याबाबत जागृती व्हावी याकरता आदिवासींचा मेळावा घेण्यात आला असल्याचे शिवकरांनी सांगितले, पांडू शिंगवा, उमा द्वारे अशोक निरगुडा, कमळाकर मेंगाळ, राजू बांगारा, लक्ष्मण खंडू वीर, कमलाकर काष्टे या आदिवासी प्रतिनिधीने चांगले सहकार्य केले.  (फोटो सौजन्य – AI Created) 

अनेक वर्षे रेंगाळलेल्या या ज्वलंत प्रश्नांवर निर्णय

हे सांगताना ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या हितार्थ चांगले निर्णय घेतले यापैकी रायगड जिल्ह्यातील १८००० आदिवासींना ‘गाव नमुना ७-ई’ आणि ‘गाव नमुना १२-ई’ या स्वरूपात महसुली सातबारा देण्याचे घोषित केले. या सर्व पेपर कात्रणाची पुस्तिका या मेळाव्यात संस्थेने वाटप करून महसूल मंत्र्याचा आदिवासीबाबत अनेक वर्ष रेंगाळलेल्या या ज्वलंत प्रश्न वर ठोस निर्णय घेतल्याबद्दल साकव संस्थेतर्फे अभिनंदनचा ठराव मंजूर करण्यात आला.

२००५ व्या अतिवृष्टीमुळे आदिवासींच्या या वन जमिनी पूर्णपणे उध्वस्त झाल्या होत्या, यासाठी संस्थेने त्यावेळी केलेली आर्थिक मदत व आदिवासीने हंदा पद्धतीने केलेले श्रमदान यामुळे या बाधित झालेल्या जमिनी वाचविता आल्या. योगायोग असा की सन २००६ व २००८ चा वन हक्क कायदा आला व याच आधारे संस्थेने वैयक्तिक दाव्यांचे स्वरूपात ६२४ दावे केले. त्यापैकी ५१० दावे मंजूर झाले, आज या वन जमिनीवर हक्क प्रस्थापित झाला आहे. – अरुण शिवकर, सचिव, साकव संस्था

महत्त्वाची बातमी ! पुण्यातील बहुतांश भागांत गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी

कृषी विभागाच्यावतीने रानभाज्यांचे प्रदर्शन

या मेळाव्यात कृषी खात्यातर्फे ईकेवायसी व फार्मर आयडीबाबत चांगले मार्गदर्शन केले, कृषी खात्यातर्फे रानभाज्या प्रदर्शन मांडण्यात आले होते. या मेळाव्यात दळी व वैयक्तिक मयत दावेदारांचे अर्ज प्रलंबित मागण्यांबाबत उपविभागीय समितीला मागणी अर्ज व नवीन दाव्यासाठी मागणी अर्ज करण्यात आले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Pen tribal meet 600 tribals gather in baradwadi to raise forest rights and government scheme issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा
1

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा
2

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन
3

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!
4

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.