Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन

Mumbai News : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीने १४ ऑक्टोबर रोजी मुंबईत ‘धम्म समता जागृती बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला सचिन अहिर हिरवा झेंडा दाखवणार असून उदय सामंत आणि संजय शिरसाट यांची उपस्थिती राहणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 12, 2026 | 08:23 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • धम्मक्रांतीच्या स्मृतींना उजाळा
  • मंत्रालय परिसरातून चैत्यभूमीपर्यंत रॅली
  • आयोजनात आर्यन मोरे यांचा पुढाकार
Mumbai News :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेनेच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने १४ ऑक्टोबर रोजी मुंबईत ‘धम्म समता जागृती बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. मंत्रालयाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी ९ वाजता या रॅलीचा प्रारंभ होणार असून, चैत्यभूमी येथे जाहीर धम्मसभेने या रॅलीचा समारोप होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या समारोप सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी आमदार राम पंडागळे यांनी दिली.

धम्मक्रांतीच्या स्मृतींना उजाळा

१४ ऑक्टोबर १९५६ हा भारतीय इतिहासातील महत्त्वाचा दिवस. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता व मानवतेचा संदेश दिला. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या बाईक रॅलीच्या माध्यमातून धम्मविचार, सामाजिक समता आणि बंधुभावाचा संदेश समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचविण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

मंत्रालय परिसरातून चैत्यभूमीपर्यंत रॅली

मंत्रालयाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर सकाळी ९ वाजता रॅलीला सुरुवात होईल. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. मुंबईतील नियोजित मार्गावरून मार्गक्रमण करत ही रॅली दुपारी चैत्यभूमी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर येथे जाहीर धम्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका

आयोजनात आर्यन मोरे यांचा पुढाकार

शिवसेनेच्या सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष आर्यन मोरे यांनी या रॅलीच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला असून, माजी आमदार राम पंडागळे हे या उपक्रमाचे मार्गदर्शक आहेत. राजकीय पक्षाच्या माध्यमातून धम्म समता जागृतीसाठी अशा प्रकारची रॅली आयोजित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा विचार, सामाजिक न्यायाची भूमिका आणि बंधुभावाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे धम्मचक्र दिनानिमित्त मुंबईत होणाऱ्या या उपक्रमाकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mumbai news shindes shiv sena to organize dhamma samata jagruti bike rally on the occasion of dhammachakra diwas event scheduled for october 14 in mumbaicp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 08:23 PM

Topics:  

  • eknath shinde news
  • Marathi News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!
1

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
2

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Shardiya Navratri 2026: केस गेले, पण आत्मविश्वास नाही! नवरात्री स्पेशलमध्ये अभिनेत्रीने सांगितली सौंदर्याला नवी व्याख्या
3

Shardiya Navratri 2026: केस गेले, पण आत्मविश्वास नाही! नवरात्री स्पेशलमध्ये अभिनेत्रीने सांगितली सौंदर्याला नवी व्याख्या

पुण्यानंतर आता मुंबईतही पेटकेअर प्रशिक्षण संस्था? मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा पुढाकार
4

पुण्यानंतर आता मुंबईतही पेटकेअर प्रशिक्षण संस्था? मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.