
Raigad News: पनवेल शहरातील प्लास्टिक पिशव्या हद्दपार, दुकानदारांना नोटिसा बजावल्या, कडक कारवाई सुरू
Farmers News : रब्बी पीककपाहणीत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर
काही प्लास्टिक पिशव्या अत्यंत पातळ असतात, ज्यामुळे त्यांचा पुन्हा वापर करताना अनेक अडचणी येतात. या प्लास्टिक पिशव्यांचा कचरा जगाची सर्वात मोठी समस्या बनलेली आहे. हा कचरा गाळ बनून आपल्या, सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईप्समध्ये, गटारांमध्ये, जमिनीत, नाल्यांमध्ये, नद्या व समुद्रात अडकून राहतो. असा कचरा साठल्यामुळे कित्येक कसदार जमिनी नापीक बनल्याची उदाहरणं आहेत. शिवाय हा कचरा हटवणं ही फार मोठी कठीण गोष्ट असते. खेरीज प्लास्टिक पिशव्यांचा हा कचरा इकडून नेऊन दुसरीकडे टाकला तरी तो नष्ट करणं शक्य नाही. त्यामुळे जगात या प्लास्टिक पिशव्यांच्या कचऱ्याचे ढिग वाढतच आहेत. आज आपण खरेदी, वेष्टन, कचरा फेकणे अशा अनेक कारणांकरता प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असतो. याच प्लास्टिक पिशवीचं विघटन होण्यासाठी सुमारे एक हजार वर्ष लागतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्लास्टिक पिशव्या येण्याआधी माणूस वस्तू ठेवण्यासाठी प्राणीजन्य पदार्थांपासून बनवलेल्या पिशव्या किंवा आवरणांचा वापर करत होता. प्राणीहत्या थांबवण्यासाठी आणि सोयीसाठी प्लास्टिक पिशव्या वापरात आल्या. पण आज त्यांचा वापर इतका वाढला आहे की प्लास्टिकच आपल्या आयुष्याचा मोठा प्रश्न बनला आहे आणि आपण त्यात अडकून पडलो आहोत.
मंडई परिसरात अनेक छोट्या विक्रेत्यांकडून सर्रास प्लास्टिक पिशव्यांमधून मालाची विक्री केली जात होती. शहरात मोठ्या संख्येने किरकोळ विक्रेते फळविक्री करतात. बहुतांश किरकोळ विक्रेते आणि फेरीवाले हे सर्रासपणे मान्यता नसलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या ग्राहकांस देत होते. त्यामुळे कच-याचा, गटार तुंबण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला होता. पालिकेच्या पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे.
पर्यावरणास घातक असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांवर राज्य सरकारकडून बंदी असल्यामुळे पनवेल शहर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडून शहरभर कारवाई सुरू करण्यात आली आहे. काही फेरीवाले, किरकोळ विक्रेते पिशव्यांमधून त्यांच्या मालाची सर्रास विक्री करत असतात असे फेरीवाले, विक्रेते क्षेत्रीय कार्यालयांच्या पथकाच्या रडारवर आहेत.
वॉर्ड २९ मध्ये ठाकूर-शेख लढत; प्रचार शिगेला, उमेदवारी रद्दीकरणाचा वाद चिघळला
स्वच्छता हि घराची लक्ष्मी हे ब्रीद वाक्य आपण आपल्या स्वतःच्या घरी कटाक्षाने पाळतो, तसेच आपले शहर हे सुद्धा आपले एक प्रकारे घरच असल्यामुळे नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या कुठल्याही विक्रेत्याकडून न घेता पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करावी आणि अश्या पिशव्या कुठल्या विक्रेत्याकडे आढळून आल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागा बरोबर संपर्क साधून स्वच्छ, सुंदर पनवेल शहरासाठी प्रशासनास सहकार्य करावे. – मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महानगरपालिक