वॉर्ड २९ मध्ये ठाकूर-शेख लढत; प्रचार शिगेला, उमेदवारी रद्दीकरणाचा वाद चिघळला (photo-social media)
Vasai-Virar News: वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेवर पोहोचला असताना वॉर्ड २९ मध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रभागात शिंदे गटाचे उमेदवार यशोधन नितीन ठाकूर यांनी बविआचे उमेदवार अफीफ जमील शेख यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी तक्रार अर्ज दाखल केल्यामुळे ही लढत आणखी कडवी होणार आहे. वॉर्ड २९ मधून यशोधन ठाकूर हे शिंदे गटातून युतीमार्फत प्रथमच निवडणूक लढवीत आहेत. या प्रभागात त्यांना बविआसह काँग्रेस व उबाठा गटाची लढत आहे. या प्रभागात इतर प्रभागांप्रमाणेच प्रचारावर भर देण्यात उमेदवार प्रयत्नशील आहेत.
बविआचे अफीफ शेख यापूर्वी प्रभागातून निवडून आले होते. तसेच त्यांनी सभापतीपद भूषवले होते. मात्र, जनसंपर्क कमी असल्याने नाराजी दिसून येते. त्यातच बंगल्यासाठी सरकारी जागा हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. यशोधन ठाकूर हे मागील काही वर्षात सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देत आहेत. त्यांची मातोश्री स्वर्गीय सुषमा ठाकूर याविभागातून पंचायत समितीवर निवडून गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पंचायत समितीचे सभापतीपदही भूषवले होते. तसेच त्या महापालिकेत नगसेवक म्हणून निवडून गेल्या होत्या.
हेही वाचा: Palghar News: खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून लघु उद्योजकाची आत्महत्या, गुन्हा दाखल
आई सुषमा ठाकूर यांच्यासह पिता नितीन ठाकूर यांचा राजकीय व सामाजिक क्षेत्रात असलेला दबदबा या बळावर तसेच जनसंपर्कावर यशोधन ठाकूर चांगले मताधिक्य मिळवू शकतील, असा राजकीय राम राम केल्यांनतर ठाकूर पिता पुत्रांसाठी ही लढत महत्त्वाची आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार रवींद्र फाटक यांनी या प्रभागात प्रचारासाठी व्यक्तिशः उपस्थिती ठेवली होती. सर्वसाधारण ३५ हजार मतदार संख्या असलेला हा प्रभाग सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या या प्रभागात दोन माजी नगरसेवकांना डावलले गेल्याने नाराजीचा सूर आहे. त्याचाही फायदा ठाकूर पिता-पुत्रांना होईल, अशी चर्चा आहे. या कडव्या लढतीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






