
Raigad News: पेणमध्ये राजकीय हालचालींना वेग! गटांसाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल, शेकाप विजयी परंपरा कायम ठेवणार ?
मंगळवारी एका दिवसात ३० उमेदवारांनी ५५ कोरे नामनिर्देशन पत्र देण्यात आले असल्याचे प्रांत अधिकारी प्रविण पवार यांनी सांगितले. १६ जानेवारी ते २० जानेवारी या चार दिवसांत तब्बल १९३ नामनिर्देशन पत्र दिले आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता असून जिल्हा परिषदेच्या पाच तर पंचायत समिती निर्वाचन गणातील दहा जागांसाठी ही नामनिर्देशन पत्र देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. (फोटो सौजन्य –Adobe Stock)
दादर जिल्हा परिषद गटात भाजपाचे रायगड जिल्हा महामंत्री आमदार पुत्र वैकुंठ रविंद्र पाटील याचा आज एकमेव अर्ज दाखल झाला आहे. वडखळ गटात शिवसेनेकडून दोन वेळा निवडून आलेल्या संजय जांभळे यांनी शेकापकडून तर मिलिंद पाटील यांनी भाजपाकडून तर समीर सुभाष म्हात्रे यांनी शिवसेना उबाठा पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. या जि.प. गटात भाजपा शेकाप, शिवसेना उथाठा अशी तिरंगी हाय होल्टेज चुरशीची निवडणूक होणार असल्याचे उमेदवारी अर्जावरुन दिसून आले.
वडखळ जि.प. मतदार संघ शेकाप आपली विजयी परंपरा कायम ठेवण्यासाठी संजय जांभळे यांच्यासारखा तगडा उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केला आहे. शिहू जिल्हा परिषद गटात उबाठाच्या पल्लवी भोईर यांनी पक्षांतर्फे एक व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज असे एकुण सहा उमेदवारी अर्ज दाखल आहेत.