Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : अखेर प्रशासनाने घेतली दखल; गावकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे 11 दिवसांनी पोहचली वीज

11 व्य़ा दिवशी या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महावितरण कडून 11 दिवसांनी तुंगी गावाचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 01, 2025 | 01:07 PM
Raigad News : अखेर प्रशासनाने घेतली दखल; गावकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे 11 दिवसांनी पोहचली वीज
Follow Us
Close
Follow Us:

 कर्जत/ संतोष पेरणे : गेले  कित्येक दिवस तालुक्यातील तुंगी गावात राहणारे ग्रामस्थ वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रस्त होते. आठवडाभरापेक्षा जास्त काळ या गावातील नागरिकांनी वीजेअभावी अनेक समस्य़ांना तोंड दिलं.  मात्र आता 11 व्य़ा दिवशी या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महावितरण कडून 11 दिवसांनी तुंगी गावाचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामध्ये तुंगी गावाला विज पुरवठा करणाऱ्या विजेच्या खांबांवर झाडे कोसळल्याने येथील वीज पुरवठा खंडित आहे.दरम्यान,महावितरणकडून आता वीज पुरवठा करण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यातील तुंगी हे गाव अंभेरपाडा ग्रामपंचायत मधील दुर्गम भागातील गाव आहे.एका उंच डोंगरावर वसलेल्या या गावात साधारण 70 घरे असून तेथे 2017 मध्ये वीज पोहचली.या मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी वन जमिनीचा प्रश्न सोडवून तुंगी गावाला वीज पोहचवणे हे कठीण असलेले काम शक्य झाले.खासदार बारणे यांच्या माध्यमातून तुंगी गावाला डोंगरपाडा येथून वीज पोहचली आणि त्यानंतर खासदार बारणे यांच्याकडून रस्त्याचा प्रयत्न होऊ लागला.त्यानंतर 2019 मध्ये वन जमिनीमध्ये रस्ता तयार करून तुंगी गावाचा जगाशी संपर्क झाला.मात्र त्याच तुंगी गावाला होणारा वीज पुरवठा 20मे पासून खंडित आहे.तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू होता आणि त्या अवकाळी पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्याने तुंगी गावाला वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर झाडे कोसळली होती.मात्र त्या दिवसापासून तुंगी ग्रामस्थ हे वीज नसल्याने अंधारात आहेत.

तुंगी गावाला डोंगरपाडा भागातून वीज जात असून विजेचे खांब हे डोंगरात उभे केले आहेत.त्या मार्गावर कशेळे पासून डोंगरपाडा पर्यंत भरपूर झाडे अवकाळी पावसाने विजेच्या वाहिन्यांवर कोसळली आहेत.ही झाडे वीज पुरवठा खंडित होण्यास कारणीभूत ठरली असून तुंगी गाव गेली 10 दिवस अंधारात आहे.त्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तालुक्याचे महावितरण विभागाचे उपअभियंता कार्यालयाला कळवले,मात्र तरी देखील वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही.

आपत्कालीन बैठकीत साधी चर्चा नाही..
कर्जत तालुका आपत्कालीन बैठक सोमवारी आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली करत तहसील कार्यालयात झाली.त्या बैठकीत सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मात्र तालुक्यातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे याबद्दल साधी चर्चा आपत्कालीन बैठकीत झाली नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.आमदारांनी तालुक्यातील सर्व खात्याचा आढावा घेतला मात्र तुंगी गावातील ग्रामस्थ अंधारात आहेत याचा आढावा घेतला गेला नाही हे विशेष.

ग्रामस्थांनी घेतला सौर ऊर्जेचा आधार..
तुंगी गावाला 2017 मध्ये वीज पोहचली आणि त्यानंतर त्या गावातील ग्रामस्थांनी दूरचित्रवाहिनी पाहिली.त्या आधी या गावातील प्रत्येक ग्रामस्थांचे घरावर सौर दिवे यांचे सोलर पॅनल असायचे.मागील काही दिवस हे ग्रामस्थ त्याच सोलर पॅनल यांचा उपयोग करीत असून त्यांच्या माध्यमातून गावातील काही घरांमध्ये विजेचे दिवे मिणमिणताना दिसून येत आहेत.
मात्र महावितरण कडून ११ वे दिवशी वीज पुरवठा सुरू करण्यात यश आले.

डॉ धनंजय जाधव.. तहसीलदार
तुंगी गावातील विजेचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न आम्हाला समजल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महावितरण कंपनी यांच्या उप अभियंता यांना कळविण्यात आले होते.

चंद्रकांत केंद्रे.. उप अभियंता महावितरण
तुंगी गावाला पोहोचणारे वीज वाहिनी यांच्या मार्गात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळली आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब कोसळणे आणि वीज वाहिन्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.त्यावर काम सर्व भागात सुरू असून आम्ही दुर्गम भागातील तुंगी पर्यंत पोहचून वीज पुरवठा पूर्ववत केला.

Web Title: Raigad news finally the administration took notice electricity reached after 11 days due to the efforts of the villagers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra
  • Marathi News
  • raigad

संबंधित बातम्या

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर;  पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज
1

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर; पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज

यंदा गणेशोत्सवासाठी ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय! श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार
2

यंदा गणेशोत्सवासाठी ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय! श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार

आता तरी जागे व्हा! HSRP Number Plate बसवण्याची मुदत पुन्हा वाढली, ‘ही’ असेल अंतिम तारीख
3

आता तरी जागे व्हा! HSRP Number Plate बसवण्याची मुदत पुन्हा वाढली, ‘ही’ असेल अंतिम तारीख

Thane News : “भीक नको न्याय हवा !” राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा चौथा दिवस
4

Thane News : “भीक नको न्याय हवा !” राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा चौथा दिवस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.