तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’ रमेश कदमांचा सवाल
कर्जत : कर्जत तालुक्यातील खांडपे कोंदिवडे या रस्त्यावरील खड्डे तेथील ज्ञानमकरंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या एका व्हायरल व्हिडिओ ने जगासमोर आणले होते. त्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी सार्वजनिक विभागाने रस्त्यावरील खड्डे भरण्याची रोलर फिरवण्याची काम केले होते. राज्याच्या मुख्यमंत्रीपासून नेत्यांनी या रस्त्याबद्दल सरकारने आपली पाठ थोपटून घेतली होती.दरम्यान अवघ्या काही दिवसांनी अगदी साध्या पावसात या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले असून या भागातील राजकारणी आता का मूग गिळून बसले सवाल उपोषणकर्ते पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी उपस्थित केला आहे. (School Girls Video)
Viral Video: छत्रीचा माईक… आणि PWD ची पोलखोल! शाळकरी मुलींच्या …
तीन शाळकरी मुलींच्या एक व्हिडिओनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. खांडपे – कोंदिवडे रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या त्या चिमुकल्या मुलींनी हातात मोबाईल घेऊन रिपोर्टरची भूमिका बजावली आणि सत्य समोर आणलं.तो व्हिडिओ वाऱ्यासारखा महाराष्ट्रभर व्हायरल झाला .त्यानंतर या भागाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट टाकून सरकार किती जागरूक आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पासून राज्यातील अनेक पक्षांचे प्रवक्ते तुटून पडले होते.त्या शाळकरी मुली यांच्यासोबत अनेक नेत्यांनी सेलिब्रिटीज यांनी संवाद साधला.विरोधीपक्षाचे राज ठाकरे,युवानेते आदित्य ठाकरे सीजेपी चे अभिजित दिपके यांच्यापासून सर्वांची रांग लागली होती.
आज तोच व्हरायल रस्ता पूर्णपणे खड्ड्यात हरवला आहे. खांडपे – कोंदिवडे रस्ता आज पुन्हा मृत्यूचा सापळा बनला आहे.खड्डेच खड्डे.चिखल,पाणी आणि अपघाताला आमंत्रण.पण आता त्या रस्त्याकडे ढुंकूनही कोणी बघायला तयार नाही.हा रस्ता येतो बीड जिल्हा परिषद गटात.हा तर घारे बंधूंचा बालेकिल्ला समजला जातो.कर्जत पंचायत समितीच्या सभापती स्वतः नमीत घारे आहेत. पण थोरवे आणि घारे यांना देखील व्हायरल व्हिडिओ नंतर धावपळ करणारे आमदार आणि आपलाच बालेकिल्ला म्हणणारे घारे यांच्याकडून काहीही बोलले जात नाही.
अशा सर्व रस्त्यांच्या विरोधात पोलीस मित्र संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.पोलीस मित्र संघटनेने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली. सर्व बांधकाम विभागांना – जिल्हा परिषद,सार्वजनिक बांधकाम, एम एम आर डी ए आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार या सगळ्यांना निवेदने दिली.इशारा दिला – “गणपती उत्सव सुरू होण्यापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा, नाहीतर बाप्पाला मांडीवर घेऊन खड्ड्यात बसून आंदोलन करू नदी पात्रात बाप्पाला घेऊन जलसमाधी घेऊ.” असून सोमवार दि. ७ तारखेला श्रीराम पुलावर* पोलीस मित्र संघटना गणपती बाप्पाला मांडीवर घेऊन रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करणार आहे.आणि तरीही दखल नाही घेतली,तर बाप्पाला मांडीवर घेऊन नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा आक्रोश या संघटनेने व्यक्त केला आहे.
गणपती उत्सव अवघ्या ८-१० दिवसांवर आला आहे.पण एकही विभाग कामाला लागायला तयार नाही. राजिप.बांधकाम विभागाने थोडीफार सुरुवात केली आहे पण तेही समाधानकारक नाही आणि त्यामुळे पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली असून रमेश कदम यांचे आगळेवेगेळे आंदोलन यावेळी आहे.






