Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पेणच्या बळीराजाला दिलासा; महापुरानंतर पावसाची साथ, भातशेतीत पुन्हा आशेचा अंकुर

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात महापुरानंतर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या हलक्या पावसामुळे भात रोपांना नवसंजीवनी मिळाली असून शेतशिवार पुन्हा हिरवाईने बहरू लागले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 26, 2026 | 01:07 PM
Raigad News: पेणच्या बळीराजाला दिलासा; महापुरानंतर पावसाची साथ, भातशेतीत पुन्हा आशेचा अंकुर

Raigad News: पेणच्या बळीराजाला दिलासा; महापुरानंतर पावसाची साथ, भातशेतीत पुन्हा आशेचा अंकुर

Follow Us
Follow Us:
  • महापुरानंतर पडलेल्या हलक्या पावसामुळे पेण तालुक्यातील भात रोपांना नवसंजीवनी मिळाली आहे.
  • सुमारे 11,600 हेक्टर भातशेती पुन्हा हिरवाईने नटू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
  • दुबार पेरणीसाठी 75% अनुदानावर महाबीज बियाणे उपलब्ध करून देत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.
पेण: पुष्य नक्षत्राच्या उंदराने शेतीला पूरक बरसात केल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. शेतशिवार हिरवाईची चादर पांघरणार असून ११ हजार ६०० हेक्टर भात शेती हिरवाईने नटणार आहे. खरीप हंगामाची चाहूल सुरु होत असताना पाच जुलैच्या महापुरात चार दिवस पाण्याखाली राहिलेल्या रोपवाटिका कुजण्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत पडला होता. परंतु गेले चार दिवस पडणाऱ्या हलक्या पावसाच्या सरीनी रोपांना संजिवनी मिळाली असून उन पावसाच्या खेळकर वातावरणात खतांची मात्रा आणि शेतशिवारात तगलेल्या रोपवाटिका हळूहळू तजेलेदार होऊन वाऱ्यावर डोलू लागल्या आहेत.

Mira-Bhayandar News: जागतिक कांदळवन दिनी भाईंदरमध्ये तरुणांचे स्वच्छता अभियान; शासकीय विभाग मात्र गैरहजर

सूर्यप्रकाशामुळे शेतशिवारात नर्सरी रोपांची दाणादाण उडाली असताना शेतशिवारात तग धरुन राहिलेल्या या रोपवाटिकांच्या हळूहळू होणाऱ्या वाढीमुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. तब्बल ११ हजार ६०० लागवडीखालील क्षेत्रावर डोंगरमाथ्यावरील तर खारेपाटातील उंचावरील भातशेतीमधे हे आशादायक चित्र सध्या पडणाऱ्या पावसामुळे दिसू लागले आहे. तरीही दुबार पेरणीसाठी बियाणे गोळा करण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरु असुन पेण तालुक्यातील शिवारात ‘कही खुशी कही गम’ असे वास्तव चित्र दिसत आहे.

मातीचे भरावामुळे पाणी वितरणात येतात अडथळे

निसर्गाची अवहेलना न परवडणारी आहे, याचे वास्तव चित्र गेल्या ६ वर्षात लागोपाठ दिसून येत आहे. कृषीपूरक ग्रामीण संस्कृतीत ८० टक्के रोजगार मिळवून देत शेतकरी मजूर बारा बलुतेदार यांच्या पोटापाण्याची वर्षभराची व्यवस्था करणारी शेती व शेतकरी संकटात असल्याने गावगाड्यात सुगीच्या दिवसात जे चैतन्य खुशीचा माहोल दिसायचा तो सिमेंटचे जागोजागी उभारलेले इमले, मातीच्या भरावामुळे नैसर्गिक पाणी वितरणाच्या मार्गात अडथळे निर्माण होऊन शेत शिवाराला दर वर्षी मिळणाऱ्या जलसमाधीमुळे शेती व शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हे परिश्रमाचे गीतगायन सध्या शिवारात दिसत नाही.

महाबीज बियाणांची ७५% अनुदानावर मोठी सुविधा

जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतीनी पेण पंचायत समिती कृषी विभागामार्फत महाबीज बियाणांची पंच्याहत्तर टक्के अनुदानावर मोठी सुविधा दिल्याने दुबार पेरणीसाठी माफक किमतीत दहा किलो बियाणे बॅग १२५/-रुपये आणि पंचवीस किलो बॅग ३२५/ रुपयांना बियाणे बॅग दिल्याने शेतकरी बांधव समाधान व्यक्त करीत आहेत.

कला शिक्षक भरतीवरून राज्यात तीव्र संताप; शासनाच्या तुटपुंज्या जागांवरून निलेश लंके अन् हेरंब कुलकर्णी आक्रमक

गेले पाच दिवस पंचायत समिती पेणतर्फे हे बियाणे वाटप करण्यासाठी स्वतः सभापती स्मिता पाटील, उप सभापती संजय डंगर आणि गटनेते विवेक म्हात्रे विद्यमान सर्व सदस्य आस्थेने शेतकरी बांधवाना मदतीचा हात देत आहेत, यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधान आहे. फाटलेल्या आभाळागत समस्येला ठिगळ लावण्यासाठी पुन्हा उमेदीने शेतशिवार सजविण्यासाठी ही उदयमशील भावना आणि दायित्व वाखाणण्याजोगे ठरते आहे. शिवारातले चैतन्य परत श्रृंगारण्यासाठी कष्टकरी बळीराजाला या कृतीने मोठा आधार मिळाला आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Raigad news pen farmers get relief as rains revive paddy fields after floods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.