
Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम रांधवे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्ते थेट निफाड नगरपंचायत ऑफिसमध्ये घुसले. आश्चर्य म्हणजे ते एकटे नाही आले, त्यांनी सोबत चार ते पाच भटकी कुत्री आणली होती.त्यांनी ती कुत्री थेट मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या ऑफिसमध्ये नेली आणि तिथेच सोडून दिली. ऑफिसच्या आवारात कुत्री फिरू लागली. एवढंच नाही तर निषेध म्हणून त्यांनी अधिकाऱ्याच्या टेबलावर पैशांच्या नोटांच्या माळा पण ठेवल्या.याचा व्हिडिओ कोणीतरी काढला आणि तो सोशल मीडियावर टाकताच तो प्रचंड व्हायरल झाला. लोक म्हणत आहेत की प्रशासनाला जाग आणण्यासाठी हाच उपाय योग्य होता.
आंदोलकांचं म्हणणं आहे की निफाडमध्ये कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण नगरपंचायत काहीच करत नाही. कुत्र्यांना पकडायला पाहिजे, त्यांची नसबंदी करायला पाहिजे, पण काहीच होत नाही.रांधवे म्हणाले की आताच गणेशोत्सव सुरू आहे. लोक गणपती बघायला मंडळात जातात, पण रस्त्यावरच्या कुत्र्यांमुळे त्यांना जायला भीती वाटते.
Yuva Sena district chief Vikram Randhave reportedly released 4–5 stray dogs inside the Niphad Nagar Panchayat chief officer’s office to protest the growing stray dog menace and alleged inaction by the civic body. 💀😭 pic.twitter.com/0wgQpHP00l — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 16, 2026
रात्री तर कुत्री गाड्यांच्या मागे लागतात, त्यामुळे अपघात पण होतात.आम्ही कित्येक वेळा तक्रार केली, पण प्रशासनाने लक्ष दिलं नाही. म्हणून आम्हाला हे करावं लागलं, असं त्यांनी सांगितलं.
आंदोलकांनी दोनच मागण्या केल्या आहेत, पण त्या महत्वाच्या आहेत.पहिली मागणी आहे की लवकरात लवकर कुत्र्यांची नसबंदी मोहीम सुरू करा. जेणेकरून त्यांची संख्या वाढणार नाही.आणि दुसरी मागणी म्हणजे कुत्र्यांना पकडण्यासाठी एक टीम बनवा आणि त्यांना ठेवण्यासाठी योग्य जागा बनवा.त्यांनी इशारा पण दिला आहे की जर अजूनही प्रशासनाने लक्ष दिलं नाही, तर यापेक्षा मोठं आंदोलन करू.
खरं तर हा प्रश्न फक्त निफाडचाच नाही, सगळ्या महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. पण अशा अनोख्या आंदोलनामुळे तरी प्रशासनाला जाग येईल अशी आशा आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आता तरी अधिकारी काम करतील असं लोकांना वाटतंय.