Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : कर्जत नेरळ स्थानकाचा होणार कायापालट ? श्रीरंग बारणे यांनी केली विकासकामांची पाहणी

मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मतदारसंघात असलेल्या नेरळ जंक्शन आणि कर्जत स्थानकातील विकास कामे यांची पाहणी करण्यासाठी भेट दिली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 23, 2025 | 06:29 PM
Raigad News : कर्जत नेरळ स्थानकाचा होणार कायापालट ? श्रीरंग बारणे यांनी केली विकासकामांची पाहणी

Raigad News : कर्जत नेरळ स्थानकाचा होणार कायापालट ? श्रीरंग बारणे यांनी केली विकासकामांची पाहणी

Follow Us
Follow Us:

स्नेहा काकडे,जाधव : कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघ खासदार श्रीरंग बारणे यांनी नेरळ आणि कर्जत रेल्वे स्थानकाला भेट दिली आहे. या भेटीमध्ये दोन्ही स्थानकातील विकासकामांची पाहणी तसेच प्रस्तावित विकास कामे याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार बारणे यांना अवगत केले. दरम्यान,या भेटीमध्ये कर्जत आणि नेरळ स्थानकाच्या आजूबाजूला असलेल्या समस्या याबाबत स्थानिक नागरिकांनी खासदारांना घेरले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मतदारसंघात असलेल्या नेरळ जंक्शन आणि कर्जत स्थानकातील विकास कामे यांची पाहणी करण्यासाठी भेट दिली. या भेटीच्या वेळी शिवसेना, भाजप या पक्षाचे कार्यकर्ते तसेच नेरळ गाव आणि कर्जत शहरातील नागरिक तसेच प्रवासी यांनी उपस्थित राहून आपले प्रश्न खासदार यांच्यासमोर मांडले.खासदार बारणे यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर,जिल्हा संघटक संभाजी जगताप,तालुका तालुका सुदाम पवाळी आणि युवा सेनेचे विधानसभा प्रमुख प्रसाद थोरवे उपस्थित होते.

नेरळ स्थानकात दोन्ही शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते, त्यात भाजप माजी तालुका अध्यक्ष राजेश भगत,तालुका सचिव अंकुश दाभने,शहर संपर्क प्रमुख किशन शिंदे,जयवंत साळुंखे,केतन पोतदार,माजी सभापती राहुल विशे,तसेच ठाकरे शिवसेनेचे युवासेना पदाधिकारी प्रथमेश मोरे,दिनेश भोईर आदी सह अनेक नागरिक प्रवासी उपस्थित होते.

यावेळी मध्य रेल्वे कडून विभागीय कमर्शियल अधिकारी अजय कुमार,कर्जत कल्याण कमर्शियल अधिकारी शिरीष कांबळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे आय डबलू के एस यादव, सीबीएस के जी विनोद, सिटीआय राजेश संधिर,आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.नेरळ स्थानकाची पाहणी केल्यानंतर नेरळ स्थानकातील विकास कामे तसेच नव्याने बदलत असलेल्या नेरळ स्थानकाच्या मेक ओव्हर कामांमध्ये कोणती कामे नियोजित आहेत यांची माहिती खासदार बारणे यांना देण्यात आली.

नेरळ स्थानकात पाडा फाटक बाबत तेथील परिसर वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त  असून तत्काळ उड्डाण पुल होण्याची कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी पंढरीनाथ चंचे यांनी केली आहे. तसंच स्थानकाच्या बाहेर असलेल्या निवासी घरांमध्ये सांडपाणी आणि पावसाचे पाणी जात असून ते बाहेर काढण्याचे नियोजन रेल्वे कडून करण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशी गुल्या जाधव यांनी केली.नेरळ स्थानकात पादचारी पुलावर लावण्यात आलेले पूर्व पश्चिम यांचे फलक यांबाबत दिनेश कालेकर यांनी तक्रार करून ते चुकीचे बोर्ड हटवण्यात यावेत अशी मागणी केली.

निर्माण नगरी भागातील महिला नागरिक यांनी पावसाचे पाणी या भागात भरून राहत असून रेल्वे कडून तत्काळ उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी केली.कर्जत स्थानकात सुरू असलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर स्टेशन प्रबंधक कार्यालयात झालेल्या बैठकीत कर्जत रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याचे गाड्या यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत अशी मागणी केली.त्यावेळी खासदार बारणे यांनी वेगवेगळ्या १४ गाड्यांना कर्जत येथे थांबे देण्यात आले असल्याची माहिती दिली.खासदार यांचे सोबत कर्जत पंचायत समिती माजी उप सभापती मनोहर थोरवे,शिवसेना तालुका संघटक दिलीप ताम्हने, मते,माजी स्वीकृत नगरसेवक संकेत भासे हे देखील उपस्थित होते.

Web Title: Raigad news will karjat neral station be transformed shrirang barne inspected the development works

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 06:20 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन
1

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी
2

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !
3

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ
4

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.