
Raigad Rain Havoc
सावित्री, कुंडलिकाने धोक्याची पातळी ओलांडली – सर्वाधिक खालापूरमध्ये ३२३.३ मिमी, त्यानंतर महाडमध्ये २७२.२ मिमी आणि सुधागडमध्ये २६८.२ मिमी पाऊस झाला आहे. सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून पाताळगंगा व उल्हास नद्यांनीही इशारा पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत लहान मोठ्या स्वरूपात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील १६ गावांतील ३०३ कुटुंबांतील १.०३२ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून, त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येत आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना अन्न, पाणी व इतर आवश्यक मदत पुरविण्यात आली. आपदा मित्र, एनडीआरएफ, स्वयंसेवक, पोलीस आणि महसूल यंत्रणेच्या संयुक्त प्रयत्नातून २०० हून अधिक नागरिक व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. जिल्ह्यात २५ ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून ७३ घरांजवळ दरडी आल्या आहेत. या घटनांमध्ये ३ जण जखमी झाले असून रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू आहे, दरडग्रस्त कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राज्य व जिल्हा मार्गावरील अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. काही ठिकाणी पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली असून रेल्वे सेवा सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
९५ घरांचे नुकसान- पूर आणि पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ४ जणांचा मृत्यु, ९ जण जखमी तर ५ जण बेपत्ता असल्याची नोंद आहे. मृत्यूच्या घटना पनवेल, कर्जत आणि महाड तालुक्यांत घडल्या असून बहुतेक दुर्घटना धबधबे, तलाव व नदीकाठी पोहण्यासाठी गेल्याने घडल्या आहेत.
याशिवाय ९५ घरांचे नुकसान, ५३४ घरामध्ये पुराचे पाणी शिरणे, १२ गोठ्याचे नुकसान, २ मंदिरे, २ शाळा आणि १२ खासगी दुकाने बाधित झाली आहेत. पशुधनाचीही हानी झाली असून ८६ कोंबड्या, एक बैल आणि दोन गायी दगावल्या आहेत. प्रशासनाकडून पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्ताना मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
KARJAT : रायगडात राष्ट्रवादीला धक्का! अंकित साखरे यांच्या भावासह पत्नीचा शिवसेनेत प्रवेश
रायगड, पालघर, मुंबईत शाळांना सुट्टी
भारतीय हवामान विभागाने ७ जुलै रोजी पालघर, – रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्याच्या जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, तसेच महानगरपालिकेच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी मंगळवार रोजी ‘ऑरेंज अलर्ट जारी – केला असून, शहरात मुसळधार पावसासह तीव्र वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.