Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: रोह्यात शेकापची रणनिती ठरली; ग्रामपंचायत निवडणुकांसह स्मार्ट मीटरविरोधी आंदोलनाचा निर्धार

रोहा येथे शेतकरी कामगार पक्षाची तालुकास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी, पक्ष संघटन मजबूत करणे आणि स्मार्ट मीटरविरोधी आंदोलनाची दिशा यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 05, 2026 | 01:59 PM
Raigad News: रोह्यात शेकापची रणनिती ठरली; ग्रामपंचायत निवडणुकांसह स्मार्ट मीटरविरोधी आंदोलनाचा निर्धार

Raigad News: रोह्यात शेकापची रणनिती ठरली; ग्रामपंचायत निवडणुकांसह स्मार्ट मीटरविरोधी आंदोलनाचा निर्धार

Follow Us
Follow Us:
  • रोह्यातील शेकाप बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकांसाठी पक्ष संघटन बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला.
  • घरोघरी बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरविरोधात आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • ६ जुलै रोजी रोहा तहसीलदारांना स्मार्ट मीटरविरोधात पुन्हा निवेदन देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले.
रोहा: रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाची महत्त्वपूर्ण सभा आरडीसी बँक, रोहा शाखेच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. आगामी स्थानिक स्वराज्य ग्रामपंचायत निवडणुका, यासाठी पक्ष संघटन मजबूत करणे त्यासाठी मोर्चे बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देणे तसेच विद्युत मंडळाकडून घरोघरी बसविण्यात येत आलेल्या स्मार्ट मीटरविरोधात आंदोलन उभारणं या प्रमुख विषयांवर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.

Solapur News: बाजार समितीत बेदाण्याची विक्रमी आवक! ४०० रुपयांपर्यंत दराची झेप; १५ हजार ४६२ बॉक्स दाखल

रोहा येथे शेकापच्या वतीने रोहा तालुकास्तरीय प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या प्रारंभी तालुका चिटणीस शिवराम महाबले यांनी पक्षाची भूमिका, विचारधारा आणि संघटनात्मक धोरण याविषयी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी २ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या शेकापच्या वर्धापन दिनाचे महत्त्व विशद करत विविध कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच राज्यभर त्याच बरोबर आपल्या तालुक्यात घरोघरी विद्युत मंडळाकडून न जुमानता बसविण्यात येत असलेले स्मार्ट मीटर या विरोधात पक्षाच्या भूमिकेची माहिती देत ६ जुलै रोजी रोहा तहसीलदार यांना पुन्हा निवेदन देण्यात येणार असून यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या बैठकीतून केले.  (फोटो सौजन्य – AI Created) 

यावेळी शेकापचे प्रमुख नेते शंकरराव म्हसकर, आरडीसीसी बँकेचे चेअरमन गणेश मढवी, जिल्हा चिटणीस सदस्य विठ्ठल मोरे, रोहा तालुका चिटणीस शिवराम महाबळे, मजूर फेडरेशनचे हेमंत ठाकूर, कार्यालयीन चिटणीस संदेश विचारे, पुरोगामी युवक संघटना रोहा अध्यक्ष संतोष दिवकर, उपाध्यक्ष अमोल शिंगरे, ज्येष्ठ कार्यकर्ते खांडेकर, तुकाराम खांडेकर, गणपत डाकी, जांभेकर, धनंजय पोकळे, सरफळे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार

पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांनी शेतकरी कामगार पक्षाचा समृद्ध इतिहास, संघर्षमय वाटचाल आणि जनतेशी असलेले घट्ट नाते यावर प्रकाश टाकला. सभेचा समारोप पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन आणि स्मार्ट मीटरविरोधी आंदोलन यशस्वी करण्याच्या संकल्पाने करण्यात आला. रोहा कार्यालयीन चिटणीस संदेश विचारे यांनी आभार मानले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शेकापचे उमेदवार उभे करून पक्षाची ताकद दाखविण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक शाखेने निवडणुकांच्या तयारीला आतापासून सुरुवात करून संघटन अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी दर्शवत सज्ज राहणे आवश्यक आहे. – गणेश मढवी, संचालक, आरडीसीसी बँक

पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण, राज्यातील पायाभूत सुविधांवर ‘कॅग’च्या अहवालाची मोहोर

शेकाप पक्षाच्या विचारांची अधिक प्रभावीपणे मांडणी करण्यासाठी नियमित अभ्यास शिबिरे आयोजित केले पाहिजेत. शेतकरी कामगार पक्ष हा तळागाळातील जनतेचा पक्ष असून त्याची विचारधारा कधीही संपुष्टात येणार नाही, असा विश्वास आहे. – शंकरराव म्हसकर, ज्येष्ठ नेते, शेकाप

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Shetkari kamgar paksha holds key meeting in roha plans gram panchayat poll strategy and smart meter protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

नोकरी टिकवण्याचं मोठं आव्हान! Tech कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मोठा दणका, आकडा भयंकर; कपात शर्यतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर
1

नोकरी टिकवण्याचं मोठं आव्हान! Tech कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मोठा दणका, आकडा भयंकर; कपात शर्यतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर

3 कोटींची नोकरी सोडून किराणा दुकान सुरू केलं! IIT गोल्ड मेडलिस्टच्या निर्णयामागचं कारण ऐकून थक्क व्हाल
2

3 कोटींची नोकरी सोडून किराणा दुकान सुरू केलं! IIT गोल्ड मेडलिस्टच्या निर्णयामागचं कारण ऐकून थक्क व्हाल

आता गावागावांत नवे उद्योजक घडणार, MACCIA चा ऐतिहासिक निर्णय! काय आहे हब-अँड-स्पोक मॉडेल?
3

आता गावागावांत नवे उद्योजक घडणार, MACCIA चा ऐतिहासिक निर्णय! काय आहे हब-अँड-स्पोक मॉडेल?

Wardha News: आष्टीत महापुराचा तडाखा; शेकडो हेक्टर खरीप पिकांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी
4

Wardha News: आष्टीत महापुराचा तडाखा; शेकडो हेक्टर खरीप पिकांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.