Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Pen Flood: पुराचा थरकाप! पेणमध्ये २ गर्भवती महिलांसाठी ‘आपदा मित्र’ ठरले देवदूत; जीवाची बाजी लावून केलं सुखरूप रेस्क्यू

रायगडच्या पेण तालुक्यातील रावे आणि तांबडशेत गावाला पुराने वेढले असताना, धाडसी 'आपदा मित्र' अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांनी रबर बोटीच्या साहाय्याने दोन ९ महिन्यांच्या गर्भवती महिलांची सुखरूप सुटका केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 07, 2026 | 07:05 PM
पुराच्या वेढ्यातून २ गर्भवती महिलांची सुखरूप सुटका!

पुराच्या वेढ्यातून २ गर्भवती महिलांची सुखरूप सुटका!

Follow Us
Follow Us:
  • पुराच्या वेढ्यातून २ गर्भवती महिलांची सुखरूप सुटका!
  • पेणमध्ये जीवाची जोखीम पत्करून ‘आपदा मित्रां’ची थरारक बचाव मोहीम
  • वाचा सविस्तर बातमी!
रायगड-अलिबाग, दि. ७ (जिमाका): पेण तालुक्यातील रावे आणि तांबडशेत या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिलेला असताना प्रसूतीची वेळ जवळ आलेल्या दोन नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलांची जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि प्रशिक्षित ‘आपदा मित्रां’च्या धाडसी प्रयत्नांमुळे सुखरूप सुटका करण्यात आली. पुराच्या पाण्याचा वेग, गावांना पडलेला पाण्याचा वेढा आणि मार्गाचा अंदाज घेण्यातील मोठी जोखीम अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपदा मित्र अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांनी लागोपाठ दोन बचाव मोहिमा यशस्वी केल्या. दोन्ही गर्भवती महिलांना सुरक्षितपणे बाहेर काढून वेळेत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून रावे, ता. पेण येथील पायल राजेश पाटील (वय २३) या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शिर्के यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांना तातडीने बचाव पथक पाठविण्याच्या सूचना दिल्या.

मात्र, रावे गावाला पुराच्या पाण्याचा पूर्णपणे वेढा पडला होता. गावापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नव्हता. त्यामुळे बोटीच्या माध्यमातूनच बचावकार्य करणे आवश्यक होते. पुराच्या पाण्याला मोठा वेग होता. तसेच पाण्याच्या वाढलेल्या पातळीमुळे मासेमारीची बोट घटनास्थळापर्यंत नेणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत बचाव मोहीम राबविणे अत्यंत जोखमीचे होते.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आणि पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी तातडीने समन्वय साधून शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या रबर बोटीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पुराच्या पाण्याचा वेग आणि मार्गाचा अचूक अंदाज घेणे कठीण असतानाही आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण घेतलेले आपदा मित्र अभिकेत म्हात्रे यांनी धाडसाने पुढाकार घेतला. त्यांना आपदा मित्र राजेश म्हात्रे यांनी साथ दिली.

Karjat News : कर्जतच्या पळसदरीत दरड कोसळली; पाच वाहने मातीखाली, मुख्य रस्ता बंद

दोन्ही आपदा मित्रांनी आपल्या प्रशिक्षणाचा आणि कौशल्याचा प्रभावी वापर करून रबर बोट पुराच्या पाण्यातून सुरक्षितपणे रावे गावातील गर्भवती महिला असलेल्या ठिकाणापर्यंत नेली. त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक बचावकार्य राबवत पायल राजेश पाटील यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या अन्य चार जणांना रबर बोटीतून सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले. बचाव पथक किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वीच प्रशासनाने रुग्णवाहिका सज्ज ठेवली होती. त्यामुळे कोणताही वेळ न दवडता पायल राजेश पाटील यांना तातडीने पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पहिली मोहीम पूर्ण होते न होते तोच दुसरा मदतीचा कॉल

रावे येथील अत्यंत जोखमीचे बचावकार्य पूर्ण होते न होते, तोच प्रशासनाला तांबडशेत गावातून आणखी एक तातडीचा मदतीचा संदेश प्राप्त झाला. तांबडशेत गावातही एक नऊ महिन्यांची गर्भवती महिला पुराच्या पाण्यात अडकली होती. तिलाही तातडीने सुरक्षितस्थळी आणून वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक होते. पहिल्या मोहिमेतील आव्हाने आणि जोखीम यांना सामोरे गेल्यानंतरही क्षणाचाही विलंब न करता आपदा मित्र अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे पुन्हा दुसऱ्या बचाव मोहिमेसाठी सज्ज झाले. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या समन्वयातून त्यांनी तांबडशेत गावाकडे धाव घेतली.

पुराच्या पाण्यातून मार्ग काढत या दोन्ही आपदा मित्रांनी दुसरी बचाव मोहीमही यशस्वीपणे पूर्ण केली. तांबडशेत येथील नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेलाही सुरक्षितपणे पुराच्या विळख्यातून बाहेर काढण्यात आले आणि तिला आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आले. एकामागोमाग एक अशा दोन अत्यंत जोखमीच्या बचाव मोहिमा यशस्वी करून आपदा मित्र अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांनी प्रसंगावधान, धाडस, प्रशिक्षण आणि सेवाभावाचा आदर्श घालून दिला. या दोन्ही नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलांना वेळेत सुरक्षितस्थळी आणून वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आल्याने माता आणि त्यांच्या गर्भातील बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे बचावकार्य अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.

जिल्हा प्रशासनाची तत्परता, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा प्रभावी समन्वय, रुग्णवाहिकेची सज्जता आणि आपदा मित्रांचे धाडस यामुळे दोन गर्भवती महिलांना वेळेत मदत मिळू शकली. जीवाची जोखीम पत्करून राबविण्यात आलेल्या या बचाव मोहिमेबद्दल रावे आणि तांबडशेत परिसरातील नागरिकांनी शासन, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि धाडसी आपदा मित्रांचे आभार मानले आहेत.

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी

Web Title: Raigad pen flood rescue two pregnant women saved by aapda mitra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • flood
  • pen news
  • raigad
  • Rescue team

संबंधित बातम्या

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी
1

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी

Raigad News: जनतेचा विरोध असेल तर बल्क ड्रग पार्क नकोच; सुनील तटकरेंची स्पष्ट भूमिका
2

Raigad News: जनतेचा विरोध असेल तर बल्क ड्रग पार्क नकोच; सुनील तटकरेंची स्पष्ट भूमिका

Maharashtra Drought 2026: पावसाने दडी मारली, कर्जतवर दुष्काळाचे सावट; हजारो हेक्टरवरील भातपीक धोक्यात
3

Maharashtra Drought 2026: पावसाने दडी मारली, कर्जतवर दुष्काळाचे सावट; हजारो हेक्टरवरील भातपीक धोक्यात

RAIGAD: एकाच ठिकाणी नागरिकांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ; ‘सेवा संकल्प’ अभियानाला प्रतिसाद
4

RAIGAD: एकाच ठिकाणी नागरिकांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ; ‘सेवा संकल्प’ अभियानाला प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.