Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gomashigad : इतिहासातील रहस्य उलगडणार? रायगडमध्ये आणखी एका किल्ल्याची भर, पुरातत्त्व खात्याकडून दखल

नुकतंच रोहा तालुक्यात एका गडाचा शोध लागला आणि दुर्गप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरली. याचं नाव गोमाशीगड. आज हा गड बऱ्यापैकी ढासळला. मात्र तरी देखील याचे काही अवशेष अजूनही आहेत त्यावरुन हा गड आहे की किल्ला यावर संशोधन सुरु आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 06, 2026 | 02:35 PM
Gomashigad : इतिहासातील रहस्य उलगडणार? रायगडमध्ये आणखी एका किल्ल्याची भर, पुरातत्त्व खात्याकडून दखल
Follow Us
Follow Us:
  • इतिहासातील रहस्य उलगडणार?
  • रायगडमध्ये आणखी एका किल्ल्याची भर, पुरातत्त्व खात्याकडून दखल
असं म्हणतात की इतिहासाच्या खोलात जितकं जावं तेवढी अनेक रहस्य बाहेर पडतात. असं एक रहस्य गेली कित्येक वर्ष रोहा तालुक्यात दडून बसलेलं आहे. हे रहस्य आहे ते शूर वीरांचं, त्यांच्या वास्तव्याचं. नुकतंच रोहा तालुक्यात एका गडाचा शोध लागला आणि दुर्गप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरली. याचं नाव गोमाशीगड. कोणे एके काळी इथे इंग्रज अधिकाऱ्याचं वास्तव्य होतं म्हणे. आज हा गड बऱ्यापैकी ढासळला आहे. मात्र तरी देखील याचे काही अवशेष अजूनही आहेत त्यावरुन हा गड आहे की किल्ला यावर पुरातत्व विभागाचं संशोधन सुरु आहे.

सातवाहनकालीन पाण्याची टाकं

गोमाशीगड ही तशी टेकडी या ठिकाणी जंगलं बऱ्यापैकी आहे. या ठिकाणाची माहिती तशी फार काही प्रचलित नाही. पण स्थानिकांच्या मते फार पुर्वी याठिकाणी शिकार केली जायची. इथे इतिहासकालीन पाण्याच्या टाक्या आहेत. त्यामुळे शिकारी करण्यासाठी येणारी माणसं काही दिवस या जंगलात रहायची देखील. पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार, ही पाण्याची टाकं सातवाहन काळातील असावी. गेले कित्येक दिवस हा तसा साधासुधा डोंगर होता पण मातीच्या भांड्यांची खापरे, ऐतिहासिक खुणा आणि पाण्याची टाकं या सगळ्यांनी इतिहास संसोधन मंडळाचं लक्ष वेधलं आणि सुरु झाला शोध या डोंगराच्या इतिहासाचा. सध्या मिळालेल्य़ा काही तुटपुंज्या पुराव्यांवर याला गड म्हणावं कि किल्ला असा सध्या संभ्रम सुरु आहे.

Karjat News : दररोज शेकडो ब्रास मातीचे उत्खनन, प्रशासनाच्या भूमिकेवर पर्यावरणप्रेमी आक्रमक

या गोमाशीगडाबाबत अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलं की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्सेंडन हा कोलाड-निजामपूर मार्गे रायगडावर गेला होता. त्यावेळी याच मार्गावर हा किल्ला अस्तित्वात असू शकतो. या डोंगराबाबत असलेल्या रहस्याच्या मुळाशी जाण्याचा निर्धार आनंद सानप आणि त्यांचे सहकारी किशोर सावरकर, सौरभ घरट, दत्तात्रय सावंत, कृष्णाराम जाधव, केतन फुलपगारे यांनी सुरू केला. ही दुर्ग शोध मोहीम सुरुवातीला केवळ अभ्यासापुरतीच होती. मात्र आता याची पाळंमुळं शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

गोमाशीगडाबाबत आणखी माहिती अशी की इथे जे काही अवशेष मिळाले त्याचा विचार करायचा झाला तर, पुर्वाीच्या या डोंगराचा टेहळणी म्हणजेच एखादं व्यापाऱ्याचं ठाणं देखील असू शकतं असं अभ्यासातून प्रथिमक अंदाज व्यक्त केला जात आहे. साधारणत: इसवी सन 900नंतरच्या काळात या किल्ल्याची निर्मिती झाली असावी, अशी शक्यता आहे, पुरातत्त्व खात्याचे तेजस गर्गे यांच्या म्हणण्यानुसार गोमाशीगड हा पुर्वी गड होता की किल्ला यावर सध्या काही ठोस सांगता येणार नाही. पुर्वीच्या काळी इथे कधी युद्ध झालं होतं का? यासाठी सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. गोमाशीगडाचा नेमका इतिहास अद्याप पुढे आला नसला तरी दुर्गप्रेमींमध्ये असा एखादा गड अस्तित्वात होता आणि त्याबाबत शोध सुरु असल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे.

Raigad News: रायगडच्या पर्यायी मार्गावर प्रश्नचिन्ह; कोट्यवधी खर्चानंतरही प्रवास धोकादायक, ग्रामस्थ संतप्त

 

Web Title: Raigad roha taluka gomashigad will the mystery of history be revealed another fort added to raigad notice from the archaeological department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • History
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

India-Russia Deal : भारताची रशियाला महाऑफर! रशियन जमिनीवरून करणार गेम चेंज?  नेमका काय प्लॅन?
1

India-Russia Deal : भारताची रशियाला महाऑफर! रशियन जमिनीवरून करणार गेम चेंज? नेमका काय प्लॅन?

India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराचा पहिला टप्पा जुलैमध्ये पूर्ण होणार; पीयूष गोयल यांची महत्त्वपूर्ण विधान
2

India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराचा पहिला टप्पा जुलैमध्ये पूर्ण होणार; पीयूष गोयल यांची महत्त्वपूर्ण विधान

LPG Price Hike: झटका बसणार… LPG सिलेंडर आणखी महागणार, केंद्र सरकारने कारण देत थेटच सांगितलं
3

LPG Price Hike: झटका बसणार… LPG सिलेंडर आणखी महागणार, केंद्र सरकारने कारण देत थेटच सांगितलं

SBI Chairman Statement : ‘केवळ Sensex कडे पाहू नका…’ SBI अध्यक्षांचा गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला
4

SBI Chairman Statement : ‘केवळ Sensex कडे पाहू नका…’ SBI अध्यक्षांचा गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.