Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: जिल्हा परिषदेत अध्यक्षपद ठरलं; आता ‘मलाईदार’ खात्याकडे सर्वांचे लक्ष

रायगड जिल्हा परिषदेत अध्यक्षपद आणि सत्ता वाटपाचे सूत्र ठरले आहे. मात्र तरी देखील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अर्थ व बांधकाम खात्यावरून महायुतीतील प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2026 | 02:49 PM
Raigad News: जिल्हा परिषदेत अध्यक्षपद ठरलं; आता ‘मलाईदार' खात्याकडे सर्वांचे लक्ष

Raigad News: जिल्हा परिषदेत अध्यक्षपद ठरलं; आता ‘मलाईदार' खात्याकडे सर्वांचे लक्ष

Follow Us
Follow Us:
  • रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन झाली असली तरी अर्थ व बांधकाम खात्यावरून महायुतीत चुरस वाढली आहे.
  • शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात ‘मलाईदार’ खाते कोणाला मिळणार यावर अंतर्गत चर्चा सुरू आहे.
  • सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीनंतर सत्ता समीकरण जुळले, पण खाते वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे.
रोहा-अष्टमी: रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन झाली असली तरी सत्तेच्या वाटपात सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अर्थ व बांधकाम खात्यावरून राजकीय रस्सीखेच रंगली आहे. जिल्हा परिषदेतील हे ‘मलाईदार’ खाते कोणाकडे जाणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले असून, यावरून महायुतीतील प्रमुख पक्षांमध्ये आतल्या गोटात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. महायुतीतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्ता समीकरणे जुळवताना अनेक तडजोडी कराव्या लागल्या.

Satara News : सभापती निवडीवेळी पत्रकारांना परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

शिवसेनेने स्वतंत्र लढा देत २१ सदस्य निवडून आपली ताकद दाखवली, तर राष्ट्रवादीला १६ आणि भाजपला १५ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालानंतर सुरुवातीला सत्तास्थापनेत पेच निर्माण झाला होता, मात्र वरिष्ठांची मध्यस्थी आणि खा. सुनील तटकरेंच्या नरमाईच्या भूमिकेमुळे महायुतीचा मार्ग मोकळा झाला. सत्तावाटपात अध्यक्षपदाचे सव्वा-सव्वा वर्षांचे सूत्र ठरले असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना अनुक्रमे संधी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पक्षाला दोन सभापती पदे देण्याचेही ठरले आहे, मात्र अर्थ व बांधकाम या महत्त्वाच्या खात्याच्या सभापतीपदावर अद्याप एकमत झाले नाही. (फोटो सौजन्य – AI Created)

महायुतीत वरकरणी दिसतेय सुसंवादाचे चित्र

राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, हे खाते सहसा उपाध्यक्षाकडे दिले जाते. त्या पार्श्वभूमीवर रोहा येथील मधुकर पाटील यांचे नाव पुढे येत आहे. तरीही शिवसेना आपली ताकद दाखवत हे खाते आपल्या वाट्याला यावे, अशी ठाम भूमिका घेत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस हे खाते मिळवण्यासाठी आग्रही असल्याचे समजते. दरम्यान, अलिबागमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात महेंद्र दळवी आणि सुनील तटकरे यांच्यातील मतभेद दूर झाल्याची चर्चा असून, त्यामुळे महायुतीत वरकरणी सुसंवादाचे चित्र दिसत आहे, मात्र पडद्यामागे खाते वाटपावरून सुरू असलेली चुरस अद्याप कायम असल्याचे बोलले जात आहे.

Mumbai News: मुंबईतील शेकडो कुटुंबांसाठी दिलासादायक! प्रलंबित LIC इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग होणार मोकळा

सर्व पक्ष एकत्र; विरोधक नसल्याची परिस्थिती

रायगडच्या राजकारणात सध्या सर्व पक्ष एकत्र आल्याने ठोस विरोधक नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक मुद्दे शांततेतच मार्गी लागत असले, तरी अर्थ व बांधकाम खात्याचा तिढा मात्र कायम आहे. येत्या काही दिवसांत हे ‘मलाईदार’ खाते कोणाच्या झोळीत पडते, यावर रायगड जिल्हा परिषदेत पुढील राजकीय समीकरणे ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Raigad zilla parishad power sharing focus shifts to key finance and construction portfolio raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’
1

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!
2

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट
3

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट

Alibaug News : हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
4

Alibaug News : हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.