Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Rains Alert: कर्जतमध्ये पावसाचा हाहाकार! २४ तासांत २९१ मिमी पावसाची नोंद, उल्हास नदीला पूर; तर ३० हून अधिक…

कर्जत तालुक्यात २४ तासांत २९१ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली असून उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दहिवली पूल पाण्याखाली गेल्याने ३० गावांचा संपर्क तुटला असून नेरळ-कळंब रस्ता बंद करण्यात आला होता.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 05, 2026 | 06:13 PM
Karjat Rains Alert: कर्जतमध्ये पावसाचा हाहाकार! २४ तासांत २९१ मिमी पावसाची नोंद, उल्हास नदीला पूर; तर ३० हून अधिक…
Follow Us
Follow Us:
  • कर्जतमध्ये पावसाचा हाहाकार
  • २४ तासांत २९१ मिमी पावसाची नोंद!
  • उल्हास नदीला पूर, ३० हून अधिक गावांचा संपर्क तुटला
कर्जत, ता.५प्रतिनिधी: कर्जत तालुक्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. माथेरान मध्ये पावसाची बॅटिंग सुरू आहे, पण कर्जत तालुक्यात देखील एका दिवसातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षापेक्षा अधिक पाऊस एका दिवसात सर्वाधिक नोंद करणारा ठरला असून २९१ मिली पावसाची नोंद झाली आहे.

कर्जत तालुक्यात असलेल्या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कर्जत तालुक्यात यावर्षी सलग तीन चार दिवस संततधार पाऊस लागून राहण्याची पहिलीच वेळ आहे. काल कर्जत तालुक्यातून वाहणारी उल्हास नदी धोक्याच्या पातळी खाली वाहत होती. मात्र रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे आज सकाळीच उल्हास नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होती. सकाळी नऊ वाजता उल्हास नदीला पूर आला होता.

कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला आलेल्या पुराचा फटका काही भागाला बसला.त्यात मुद्रे नाना मास्तर नगर पासून पुढील भागात असलेल्या मालवाडी परिसरातून वाहणाऱ्या उल्हास नदीचे पाणी आजुबाजूच्या लोकवस्तीत घुसले.त्याचवेळी नाना मास्तर नगर मधील नदीलगत असलेल्या भागाला पुराचा धोका निर्माण झाल्याने कर्जत नगरपरिषद कडून खबरदारी घेण्यात आली.त्याचवेळी शहरातील शनी मंदिर परिसरात देखील पुराच्या पाण्याचा फटका बसला तर बामचा मळा भागातून पुराचे पाणी पुढे येत होते.

Matheran News : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता! माथेरान मिनी ट्रेन फाटकाजवळ खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक हैराण

या नदीवरील दहिवली येथील पूल पाण्याखाली गेला. त्याचा परिणाम त्या भागातील ३० हून अधिक गावात जाण्याचा संपर्क तुटला होता. नेरळ पोलिसांनी नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील पूल धोक्याच्या पातळी ओलांडून पाणी वाहत असल्याने नेरळ पोलिसांनी पुलावरून कोणीही स्टंटबाजी करू नये यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दुपारी चार वाजता नेरळ कळंब रस्त्यावरील पुलावरून पाणी जाण्याचे बंद झाल्याने या भागातील लोकांच्या जीवात जीव आला. या पुलामुळे कळंब रस्ता बंद करण्यात आला होता. त्याचवेळी दुसरीकडे कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या चिल्हार आणि पेज नदी देखील दुथडी भरून वाहत असल्याने काहीकाळ चिंतेचे वातावरण कर्जत तालुक्यात निर्माण झाले होते.

Karjat News : ‘सनाधरा रिसॉर्ट’मध्ये मृत्यूचा सापळा; निष्काळजीपणामुळे दोन मजले कोसळले, स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी

Web Title: Rain havoc in karjat 291 mm of rain recorded in 24 hours ulhas river flooded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Karjat
  • mansoon
  • Rain Alert

संबंधित बातम्या

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…
1

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…
2

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ
3

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
4

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.