टोरंट प्रकल्पामुळे वीजपुरवठा अधिक सक्षम होणार! आमदार महेंद्र थोरवेंचा प्रकल्पाला पाठिंबा
Torrent Power Karjat Project: कर्जत तालुक्यात टोरंट प्रकल्प आल्याने राज्य वीज संपन्न होणार आहे. त्यासाठी टोरंट प्रकल्पाला आमचा पाठिंबा असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जाहीर केले.प्रकल्पात जमीन जाणार असलेल्या स्थानिकांचे प्रश्न सुटल्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. तर प्रकल्प होत असताना झाडे तोडली जाऊ शकतात, पण दुप्पट तिप्पट झाडे लावली जाणार आहेत आणि ती लावली देखील पाहिजेत अशी आपली भूमिका असल्याचे स्पष्ट केले.(Torrent Power Karjat Project)
टोरंट प्रकल्पामुळे राज्याला अधिकची वीज मिळणार आहे, विजेची कमतरता भासू नये याकरिता प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आपण सर्व सहकार्य करणार असून आपल्या भागाचा विकास अशा प्रकल्पामुळे होणार आहे. कर्जतमध्ये उभ्या राहणाऱ्या टोरंट प्रकल्पाला सर्वच स्तरातून विरोध होतोय मात्र स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी याबाबत महत्वपूर्ण विधान केले.
या प्रकल्पामुळे राज्य शासनाला मोठी मदत मिळणार असून या प्रकल्पाला आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर करीत म्हणत या प्रकल्पाला स्थानिक आमदार असलेले महेंद्र थोरवे यांनी हिरवा कंदील दर्शविला आहे. प्रकल्प येत असेल तर स्थानिकांसाठी या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. तशी रोजगार निर्मिती आमच्या सारख्या औद्योगिककरण नसलेल्या तालुक्यातील तरुणांना रोजगार देणारी असेल.
स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ यांचे प्रश्न राज्य सरकारकडून सोडवून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. स्थानिकांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोवर या धरणाचे काम पुढे नेऊ नये अशी आपली भूमिका आहे.मात्र राज्य सरकार कडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचे सर्वतोपरी सहकार्य असणार आहे असे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रकल्प होण्यात काही अडचणी नाहीत.
धरण होणार असलेल्या ठिकाणी झाडे तोडली जात आहेत,जेवढी झाडांची तोड होते आहे त्याच्या दुप्पटीने राज्य शासन वृक्ष लागवड करणार असून टोरंट कडून देखील झाडे लावून घेतली जातील.त्याचवेळी वन विभागाने झाडांचे संवर्धन करण्याचा काम करणार आहे.मात्र आम्ही धरण व्हावे आणि त्यातून वीज निर्मिती व्हावी या मताचे असून सरकारच्या भूमिकेच्या पाठीशी आहोत.
Kalwa Power Cut : “आमच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?” संतप्त नागरिकांचा सवाल






