Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: शिक्षण ते समाजसेवा! पनवेलमध्ये ‘संकल्प’ संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण; नागरिकांना जोडणार एक नवे व्यासपीठ

पनवेलमधील संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेने समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याला डिजिटल बळ देत अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन केले. या वेबसाईटमुळे संस्थेचे विविध उपक्रम अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचणार असून समाजहिताच्या चळवळीला नवी दिशा मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 03, 2026 | 02:57 PM
Raigad News: शिक्षण ते समाजसेवा! पनवेलमध्ये 'संकल्प' संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण; नागरिकांना जोडणार एक नवे व्यासपीठ

Raigad News: शिक्षण ते समाजसेवा! पनवेलमध्ये 'संकल्प' संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण; नागरिकांना जोडणार एक नवे व्यासपीठ

Follow Us
Follow Us:
  • पनवेलमध्ये संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
  • संस्थेने शिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि सामाजिक उपक्रमांद्वारे अल्पावधीत उल्लेखनीय कार्य उभे केले आहे.
  • नव्या वेबसाईटमुळे संस्थेचे उपक्रम, सदस्य नोंदणी आणि समाजहिताच्या योजनांची माहिती देश-विदेशातील नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहे.
पनवेल: शिक्षण, समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणाऱ्या संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन रविवारी पनवेल येथील विरूपाक्ष सभागृहात पार पडले. महाराष्ट्राच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी संस्थेने गेल्या काही वर्षात राबविलेल्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करत ही संस्था भविष्यातही समाजहिताची प्रेरणादायी चळवळ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

Satara News: कराडतून मोठा एल्गार! शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष आणखी तीव्र

समाजात शिक्षणाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने शिक्षिका वैशाली जगदाळे यांनी संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली. अल्पावधीतच संस्थेने शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक उत्तरदायित्व, पर्यावरण, सैनिकांविषयी कृतज्ञता आणि गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम उभे केले आहे. कोणत्याही शासकीय योजनेची वाट न पाहता समाजातील नागरिकांना सहभागी करून घेत सामाजिक उपक्रमांची प्रभावी चळवळ उभारण्यात संस्थेला यश आले आहे. (फोटो सौजन्य – AI Created) 

पाठ्यपुस्तक आदान-प्रदान अभियान; पालक-विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

कोरोनाकाळात अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट आले होते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी संस्थेने शालेय पाठ्यपुस्तक आदान-प्रदान अभियान सुरू केले. एका विद्यार्थ्यांची पुस्तके दुसऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या या अभिनव संकल्पनेला पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पर्यावरण संवर्धनाबरोबरच पालकांचे लाखो रुपयांचे शैक्षणिक खर्च वाचले. आजही हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात सुरू असून अनेक कुटुंबांसाठी तो मोठा दिलासा ठरत आहे. शिक्षक दिनानिमित्त विशेष शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. महिला सक्षमीकरणालाही संस्थेने विशेष प्राधान्य दिले आहे.

मनसुख हिरेन हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; वाझे, शर्मांसह 10 जणांवर आरोप निश्चित

संस्थेच्या कार्याशी जोडणे सुलभ

संस्थेच्या वाढत्या कार्याचा विस्तार आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकृत वेबसाईट विकसित करण्यात आली आहे. या वेबसाईटवर संस्थेची स्थापना, ध्येय उद्दिष्टे, विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम, सदस्य नोंदणी, कार्यक्रमांचे छायाचित्र संग्रह, आगामी उपक्रम, समाजहिताच्या योजना तसेच संस्थेशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे देश-विदेशातील नागरिक, माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि देणगीदार यांना संस्थेच्या कार्याशी जोडले जाणे अधिक सुलभ होणार आहे. यावेळी महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, अभिनेते पुष्कर श्रोत्री, पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उमा पारवे, ज्योती सोनार, संगीता कुंभार, सुनंदा गरड, स्वप्नील पाटील, प्रणव काळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Sankalp educational and social institution launches official website in panvel raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
1

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
2

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.