शिवराज्याभिषेक सोहळ्याहून परतताना भीषण अपघात; शिवप्रेमींचं वाहन उलटलं
रायगडमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रायगडावर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा आटोपून परतत असताना शिवप्रेंमींच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. माणगावजवळील बोरवाडी गावाच्या हद्दीत हा अपघात झाला असून शिवप्रेमी गंभीर जखमी झाले आहेत.
6 जूनला रायगडावर शिवराज्याभिषेकाचं आयोजन केलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रातून शिवराज्याभिषेकाला शिवप्रेमी येत असतात. यावर्षीही मोठ्या थाटात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. राज्यातून मोठ्या संख्येन शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले होते. सोहळा पार पडल्यानंतर शिवप्रेमी परतीच्या मार्गावर लागले होते.
दरम्यानसोहळा आटोपून घरी परतणाऱ्या शिवप्रेमींच्या एका वाहनाचा अपघात झाला. बोरवाडी गावाजवळ वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोण जण गंभीर जखमी झाले आहेत तर दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
Thane News : मिठी नदीतील गाळ अन् नागरिकांच्या जीवाशी खेळ, नागरिकांनी व्यक्त केला संताप
रायगडच्या निजापूरदरम्यान अवघड वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर वाहन रस्त्यावर पलटी झालं. चारचाकी वाहन पलटी झालं होतं. अपघातानंतर काहींनी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान जखमींना तातडीने बाहेर काढून माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नांदेडमध्येही मोठा अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. नांदेड शहरातील समाजकल्याण कार्यालयासमोर दुचाकी आणि पिकप यांची धडक बसली. अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना विष्णुपुरी येथील रुग्णालय उपचारासाठी पाठवून दिलं. जखमी दोघेही बिलोली तालुक्यातील असल्याची माहिती आहे.