Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक

पोशीर नदीवर बोरगाव येथे धरण बांधले जाणार असून याला शेतकऱ्यांनी विरोध आहे. गाव बैठकाही सुरू झाल्या आहेत. दरम्यान धरणाचे काम दिलेल्या ठेकेदाराला स्थानिकांनी पिटाळून लावले असून धरणाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 01, 2026 | 11:18 PM
Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक

Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:
  • स्थानिक ग्रामस्थांनी सुरू केल्या गाव बैठका
  • पोशीर धरणाला शेतकऱ्यांचा विरोध
  • मुंबईची तहान की शेतकऱ्यांचे अस्तित्व?
 

Raigad News: पोशीर नदीवर बोरगाव येथे धरण बांधले जाणार असून याला शेतकऱ्यांनी विरोध आहे. गाव बैठकाही सुरू झाल्या आहेत. दरम्यान धरणाचे काम दिलेल्या ठेकेदाराला स्थानिकांनी पिटाळून लावले असून धरणाच्या विरोधात येथील शेतकरी आक्रमक झाला आहे. मुंबई महानगरची वाढती तहान भागवण्यासाठी राज्य सरकारने कर्जत तालुक्यातील पोशीर आणि शिलार धरण प्रकल्पांना हिरवा कंदील दिला आहे. मात्र या निर्णयानंतर स्थानिक पातळीवर संघर्षाची ठिणगी पडली आहे. पोशीर प्रकल्पासाठी तब्बल २,११० कोटी रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली असून ‘मे. प्रसाद कन्स्ट्रक्शन’ कंपनीला रायगड पाटबंधारे विभागाकडून कार्यारंभ आदेशही दिले.

Panvel Municipal Corporation: ६ मार्चला महत्त्वाची महासभा; पनवेल महानगरपालिका विकासासाठी सज्ज

प्रशासनाने कामाला गती दिली असली तरी बाधित गावांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. एकीकडे सरकार प्रकल्प मार्गी लावण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे स्थानिकांचा वाढता विरोध पाहता पोशीर प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा संघर्ष किती तीव्र होणार? प्रशासन आणि शेतकरी यांच्यात तोडगा निघणार का? याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. बोरगावजवळील पोश्री नदीवर प्रस्तावित असलेल्या या धरणामुळे सुमारे १ हजार २२१ हेक्टर सुपीक जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पामुळे बोरगाव, बोंडेशेत, पेंढरी ही तीन गावे बाधित होणार असून धरणाच्या पाण्याचे क्षेत्र हे परिसरातील भोपळेवाडी, चेवणे, चई, ओलमन आणि चाफेवाडी या गावाला विळखा घालणार आहे. पिढ्यानपिढ्या कसत आलेली जमीन गमवावी लागेल, भूमिहीन व्हावे लागेल आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

Karjat News : अपघाताचं सत्र संपता संपेना; कर्जत-कल्याण राज्यमार्गावर होतोय मृत्यूचा सापळा

“आमची जमीन हीच आमची आई आहे. मुंबईची तहान भागवण्यासाठी आम्हाला बेघर करण्याचा प्रयत्न होतोय. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमची वडिलोपार्जित जमीन देणार नाही”, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे. नेतृत्व आता स्थानिक युवकांनी हाती घेतले. बोरगाव येथील पुरातन शिवमंदिरात नुकतीच नियोजन बैठक झाली. शासनाच्या कोणत्याही सर्वेक्षणाला विरोध करणे, कामाला अटकाव करणे, प्रकल्पामुळे नुकसानीबाबत जनजागृती करणे, अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

Web Title: Strong opposition to dam on poshir river farmers aggressive in borgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 11:18 PM

Topics:  

  • Dam Water Level
  • raigad

संबंधित बातम्या

Karjat News: नेरळ पाडा मिनीट्रेन मार्गावरील फाटक-रस्ता बंद; वाहनचालकांचा संताप
1

Karjat News: नेरळ पाडा मिनीट्रेन मार्गावरील फाटक-रस्ता बंद; वाहनचालकांचा संताप

Raigad News: मुरुडमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न; केवळ १ तासच पाणीपुरवठा, कोर्लई गाव सर्वाधिक प्रभावित
2

Raigad News: मुरुडमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न; केवळ १ तासच पाणीपुरवठा, कोर्लई गाव सर्वाधिक प्रभावित

Raigad News: कर्जत नगरपरिषदेविरोधात संताप! नागरी सुविधांसाठी पोलीस मित्र संघटनेचा उपोषणाचा इशारा
3

Raigad News: कर्जत नगरपरिषदेविरोधात संताप! नागरी सुविधांसाठी पोलीस मित्र संघटनेचा उपोषणाचा इशारा

Raigad News: नेरळ ग्रामपंचायतीत मोठा घोटाळा उघड! 43 अनधिकृत नळजोडण्या समोर, कारवाईचे आदेश
4

Raigad News: नेरळ ग्रामपंचायतीत मोठा घोटाळा उघड! 43 अनधिकृत नळजोडण्या समोर, कारवाईचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.