Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Torrent Hydraulic Power Project: टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टला ग्रामस्थांचा विरोध; आंबोटपाठोपाठ भालीवडीतही जागेची मोजणी रद्द

Torrent Hydraulic Power Project: टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टसाठी करण्यात येणाऱ्या जागेच्या मोजणीला स्थानिक ग्रामस्थांकडून विरोध होत आहे. आंबोट गावातील ग्रामस्थांनंतर आता भालीवडी ग्रामस्थांनीही प्रकल्पासाठी नियोजित जागेची मोजणी रद्द केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 12, 2026 | 12:37 PM
टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टला ग्रामस्थांचा विरोध; आंबोटपाठोपाठ भालीवडीतही जागेची मोजणी रद्द

टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टला ग्रामस्थांचा विरोध; आंबोटपाठोपाठ भालीवडीतही जागेची मोजणी रद्द

Follow Us
Follow Us:
  • टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्ट
  • आंबोट पाठोपाठ भालीवडी ग्रामस्थांनी रद्द केली जागेची मोजणी
  • आंबोटनंतर भालीवडी ग्रामस्थांचा विरोध
 

कर्जत: कर्जत तालुक्यात येऊ घातलेल्या टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्ट चे सायडोंगर येथे जाण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या रस्त्याची मोजणी दुसऱ्यांदा स्थानिक शेतकऱ्यांनी हाणून पाडली. काही दिवसांपूर्वी आंबोट गावातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जमिनीची मोजणी न करता परतवून लावले होते, त्यानंतर आज भालिवडी गावातील ग्रामस्थांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जमिनीची मोजणी करून दिली नाही. (Torrent Hydraulic Power Project)

हायड्रॉलिक प्रकल्प उभारण्याच्या हालचाली

टोरंट एनर्जी सोल्युशन पॉवर प्रोजेक्ट कंपनी कडून कर्जत तालुक्यातील सायडोंगर येथे हायड्रॉलिक प्रकल्प उभारण्याच्या हालचाली करीत आहे.केंद्रीय आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ स्तरावरून या प्रकल्पाला हिरवा कंदील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्य सरकारचे रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाने सायडोंगर ते भालीवडी असा 5.900 किलो मीटर लांबीचा रस्ता बनवण्यासाठी अधिसूचना काढली आहे.

Karjat News : टोरेंटबाबत ग्रामस्थांचा आक्षेप; ग्रामपंचायती प्रकल्पाला गो बॅकचे निर्देश

या रस्त्यासाठी भालिवडी पासून आंबोट,पाली,पोटल आणि सायडोंगर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी ही अधिसूचना काढली गेली आहे. त्याचवेळी हुमगाव येथून सायडोंगर असा आणखी एक रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. भालिवडी पासून सायडोंगर असा रस्ता बनवण्यासाठी कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून मोजणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्यसरकारचे आहेत. त्यानुसार बांधकाम खात्याचे अप अभियंता राहुल देवांग यांच्याकडून रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची मोजणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जमीन मोजणी करण्यास विरोध

मात्र या हायड्रॉलिक प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे.काही दिवसापूर्वी आंबोट गावातील जमिनीमधून संभाव्य रस्ता नेण्याचे टोरंट कंपनी कडून ठरवले आहे,त्या जागेची मोजणी करण्यासाठी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पोहचले होते.त्यावेळी ग्रामस्थांनी एकजूट दाखवत आपली जमीन मोजणी करण्यास विरोध केला होता आणि त्यामुळे बांधकाम खात्याला जमिनीची मोजणी करता आली नव्हती. त्यानंतर आज भालिवडी येथे बांधकाम खात्याचे उप अभियंता राहुल देवांग आणि शाखा अभियंता पोहचले. यावेळी काही मिनिटात भालिवडी गावातील ग्रामस्थ येथे पोहचले.

मयुर पाटील यांनी आमच्या जमिनीत तुम्ही आलेच कसे?असा प्रश्न विचारत आमच्या जमिनीतून तुम्ही निघून जावे अशी रोखठोक भूमिका घेतली.त्यावेळी अनेक शेतकरी पुढे आले आणि त्यांनी जमिनीची मोजणी करू दिली नाही.शेवटी भालिवडी पासून सुरू होणाऱ्या टोरंट कंपनीच्या रस्त्याला सुरुवात होत असलेल्या भागात स्थानिकांचा विरोध झाल्याने रस्ता करण्यासाठी जमीन मिळणार काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Kalwa Power Cut : “आमच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?” संतप्त नागरिकांचा सवाल

Web Title: Torrent hydraulic power project bhaliwadi villagers stop land survey after ambot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे
1

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे

Bhimashankar Temple: श्रावणानंतर भीमाशंकर परिसर चकाचक; भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई
2

Bhimashankar Temple: श्रावणानंतर भीमाशंकर परिसर चकाचक; भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई

Ulhasnagar News: ‘माझ्या मुलाला सुखरूप परत आणा’; आई रागावली म्हणून घर सोडले, 15 दिवसांपासून फोटोचे बॅनर घेऊन आईचा शोध
3

Ulhasnagar News: ‘माझ्या मुलाला सुखरूप परत आणा’; आई रागावली म्हणून घर सोडले, 15 दिवसांपासून फोटोचे बॅनर घेऊन आईचा शोध

FDA News: एफडीएची राज्यभर धडक कारवाई! 3 महिन्यांत 12,083 तपासण्या; तब्बल 67.20 कोटींचा अन्नसाठा जप्त
4

FDA News: एफडीएची राज्यभर धडक कारवाई! 3 महिन्यांत 12,083 तपासण्या; तब्बल 67.20 कोटींचा अन्नसाठा जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.