Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: उरण नगरपरिषदेत राजकीय संघर्ष; बहुमताचा खेळ की विकासाला अडथळा? नागरिकांच्या कामांवर होणार परिणाम

उरण नगरपरिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेत राजकारण आणि विकास यांचा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला. बहुमताच्या जोरावर विरोधकांनी महत्त्वाच्या नागरी कामांना विरोध केल्याने नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 18, 2026 | 02:10 PM
Raigad News: उरण नगरपरिषदेत राजकीय संघर्ष; बहुमताचा खेळ की विकासाला अडथळा? नागरिकांच्या कामांवर होणार परिणाम

Raigad News: उरण नगरपरिषदेत राजकीय संघर्ष; बहुमताचा खेळ की विकासाला अडथळा? नागरिकांच्या कामांवर होणार परिणाम

Follow Us
Follow Us:
  • बहुमताचा प्रभाव – भाजपाकडे १२ नगरसेवक असल्याने ठरावांवर त्यांचा निर्णायक प्रभाव दिसून आला.
  • महत्त्वाच्या कामांना विरोध – पाणी, रस्ते, गटार, सुरक्षा भिंत यांसारख्या आवश्यक कामांचे ठराव नामंजूर.
  • नागरिकांमध्ये नाराजी – पावसाळ्यापूर्वी कामे रखडल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली.
उरण: उरण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी नगरपरिषद सभागृहात शांततेत पार पडली. मात्र या सभेत राजकीय संघर्षांची ठिणगी स्पष्टपणे पाहायला मिळाली. विरोधी बाकावर असलेल्या भाजपाच्या नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर अनेक महत्त्वाच्या नागरी सुविधांशी संबंधित ठरावांना विरोध दर्शवत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. परिणामी, नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित कामे पुन्हा एकदा राजकारणाच्या कचाट्यात अडकली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार! १ जूनपासून प्रसाधनगृहे मोफत, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती. त्याचवेळी मविआचे आठ नगरसेवक निवडून आले, तर भाजपाचे १२ नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे नगराध्यक्षपद गमावूनही भाजपाकडे नगरपरिषदेमध्ये संख्याबळ टिकून राहिले. याच बहुमताच्या जोरावर सभागृहातील निर्णय प्रक्रियेत भाजपाचा प्रभाव कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.  (फोटो सौजन्य – AI Created)

राजकारण की विकास ? नागरिकांत चर्चेचा विषय

एकंदरीत, निवडणुकीनंतर चार महिन्यांनंतरही उरण नगरपरिषदेमधील राजकीय वातावरण तापलेलेच असल्याचे या सभेतून दिसून आले. बहुमताच्या जोरावर घेतले जाणारे निर्णय आणि विकासकामांवर होणारा परिणाम यामुळे “राजकारण की विकास?” असा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

अत्यावश्यक कामावर विरोध

शुक्रवारी झालेल्या सभेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विविध कामांसाठी ठराव मांडण्यात आले होते. मात्र, विरोधकांनी निधीअभावाचे कारण देत या ठरावांना विरोध केला. यामध्ये पाणीपुरवठा टाक्यांची स्वच्छता, बोरी गावातील रस्त्याची दुरुस्ती, बोरी गावातील मुख्य नाल्यालगत सुरक्षा भित उभारणे, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, गटार बांधकाम व दुरुस्ती, अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक बसविणे. ही सर्व कामे नागरिकांच्या सुरक्षेशी आणि आरोग्याशी थेट संबंधित असतानाही विरोध झाल्याने चिता व्यक्त केली.

१० विरुद्ध १२ मतांनी ठराव नामंजूर

सभेमध्ये प्रत्येक ठरावावर मतदान घेतले असता १० विरुद्ध १२ अशा मतांनी ठराव नामंजूर करण्यात आले. यावेळी नगरसेवक अतुल ठाकूर, प्रमिला पवार आणि स्वीकृत सदस्य गणेश शिंदे यांनी नागरी सुविधा लक्षात घेऊन ठराव मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र विरोधकांच्या एकजुटीपुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

Shahapur News : शहापूरच्या जंगलात आगीचा तांडव; वणव्यामुळे हजारो हेक्टर हिरवाई जळून खाक

नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष?

सभेत राजकीय भूमिका ठामपणे मांडताना विरोधकांनी निधीअभावाचा मुद्दा पुढे केला असला, तरी नागरिकांच्या मूलभूत गरजांवर परिणाम होणाऱ्या कामांना विरोध केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा जवळ येत असताना ही कामे रखडल्यास नागरी समस्या, आरोग्याच्या समस्या आणि अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

नगराध्यक्षा भावना घाणेकर यांची प्रतिक्रिया

नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, “विरोधकांनी राजकारण करणे स्वाभाविक आहे. मात्र नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने होणे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल.

Web Title: Uran municipal meeting turns political key civic proposals rejected amid majority clash raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
1

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी
2

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी
3

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?
4

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.