Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: उरणकरांसाठी दिलासादायक बातमी! उरण-नवी मुंबई रेल्वे फेऱ्यांत होणार वाढ, लवकरच जाहीर होणार वेळापत्रक

उरण शहराला उपनगरी रेल्वे जाळ्याशी जोडणारी ही पहिलीच मोठी सोय असल्याने प्रवाशांकडून याला मोठा प्रतिसाद मिळाला. दोन दिवसापूर्वीच भारतीय रेल्वे मंत्रालयाने मध्यरेल्वेला फेऱ्या वाढविण्याबाबत लेखी सूचना दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 07, 2025 | 02:45 PM
Raigad News: उरणकरांसाठी दिलासादायक बातमी! उरण-नवी मुंबई रेल्वे फेऱ्यांत होणार वाढ, लवकरच जाहीर होणार वेळापत्रक

Raigad News: उरणकरांसाठी दिलासादायक बातमी! उरण-नवी मुंबई रेल्वे फेऱ्यांत होणार वाढ, लवकरच जाहीर होणार वेळापत्रक

Follow Us
Close
Follow Us:
  • उपनगरी रेल्वेसेवेत लवकरच मोठी वाढ होणार
  • लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर होणार
  • नेरूळ-उरण नवीन फेऱ्या सुरू करण्याची प्रक्रिया होणार सुरु
उरणकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. उरण ते नवी मुंबईदरम्यान दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या उपनगरी रेल्वेसेवेत लवकरच मोठी वाढ होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या मार्गावर दिवसाला तब्बल दहा अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन स्तरावर घेतला जात असून लवकरच याबाबतचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.

Badlapur Breking: महाविकास आघाडीला मोठा धक्का! ठाकरे गटाच्या चिन्हावर लढणारे ७ उमेदवारांचा भाजपला पांठिबा; राजकीय वातावरण तापले

२०२४ मध्ये सुरू झालेली ‘लाईफलाईन’ जानेवारी २०२४ मध्ये बेलापूर व नेरूळ स्थानकांपर्यंत उरण रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. उरण शहराला उपनगरी रेल्वे जाळ्याशी जोडणारी ही पहिलीच मोठी सोय असल्याने प्रवाशांकडून याला मोठा प्रतिसाद मिळाला. नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईकडे शिक्षण व नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरली. (फोटो सौजन्य – Pinterest)

अतिरिक्त सेवांची गरज

सध्या या मार्गावर अंदाजे ४० फेऱ्या चालू असल्या तरी प्रवासीभार आणि वाढत्या मागणीमुळे अतिरिक्त सेवांची गरज निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसापूर्वीच भारतीय रेल्वे मंत्रालयाने मध्यरेल्वेला फेऱ्या वाढविण्याबाबत लेखी सूचना दिली आहे. प्रस्तावानुसार बेलापूर-उरण ६ नवीन फेऱ्या, नेरूळ-उरण ४ नवीन फेऱ्या अशा दहा अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे.

रात्रीच्या फेऱ्यांचीही मागणी

दैनिक प्रवासी मनोज ढाकूर यांनी रात्रीच्या शेवटच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. उरणमध्ये कामानिमित्त उशिरा परतणाऱ्या प्रवाशांसाठी रात्री उशिरापर्यंत गाड्या असाव्यात, यामुळे प्रवास अधिक सुलभ होईल, असे ते म्हणाले.

Raigad News: उरण-पनवेल राज्य महामार्गाला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गाच्या कामाचा वेग मंदावला! वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण

आता कनेक्टिव्हिटीही होणार अधिक सुलभ

एकूणच, उरण नवी मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा आणखी मजबूत होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे उरणकरांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार असून परिसरातील कनेक्टिव्हिटीही अधिक सुलभहोणार आहे.

नवीन थांबे सुरू करण्याचीही शक्यता

तरघर आणि गव्हाण या दोन्ही स्थानकांवर थांबे सुरू करण्याची सूचनादेखील देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या स्थानकांवर प्रवाशांची संख्या मोठी असल्याने बराच काळापासून रहिवासी आणि सामाजिक संघटना थांबे सुरू करण्याची मागणी करत आहेत. रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असला, तरी फेऱ्या वाढविण्याची नेमकी तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. पुढील काही दिवसांतच मध्यरेल्वेकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Uran navi mumbai local trains journeys will increase raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Local Trains
  • raigad
  • railways

संबंधित बातम्या

मातीच्या ढिगाऱ्याखाली लपून होतं एक अनोखं रहस्य! कोकणातील ‘या’ गडावर सापडला शिवकालीन गुप्त दरवाजा
1

मातीच्या ढिगाऱ्याखाली लपून होतं एक अनोखं रहस्य! कोकणातील ‘या’ गडावर सापडला शिवकालीन गुप्त दरवाजा

Raigad News: उरण-पनवेल राज्य महामार्गाला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गाच्या कामाचा वेग मंदावला! वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण
2

Raigad News: उरण-पनवेल राज्य महामार्गाला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गाच्या कामाचा वेग मंदावला! वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण

शेवटी लेकीचा बाप तो… परगावी जाणाऱ्या मुलीला ट्रेनमधून जाताना पाहिलं, एका हाकेतच खिशात घातला हात अन्… Video Viral
3

शेवटी लेकीचा बाप तो… परगावी जाणाऱ्या मुलीला ट्रेनमधून जाताना पाहिलं, एका हाकेतच खिशात घातला हात अन्… Video Viral

Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान
4

Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.