Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: उरणमध्ये पाणीटंचाईचे संकट? रानसई धरणाचा पाणीसाठा घटला; नोव्हेंबरपासून कपातीची शक्यता

येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर नोव्हेंबर महिन्यापासून उरण तालुक्यात पाणीकपात लागू करण्याची शक्यता एमआयडीसी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 03, 2026 | 02:48 PM
Raigad News: उरणमध्ये पाणीटंचाईचे संकट? रानसई धरणाचा पाणीसाठा घटला; नोव्हेंबरपासून कपातीची शक्यता

Raigad News: उरणमध्ये पाणीटंचाईचे संकट? रानसई धरणाचा पाणीसाठा घटला; नोव्हेंबरपासून कपातीची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • रानसई धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने घट
  • औद्योगिक प्रकल्प आणि ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी रानसई धरणावर
  • पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने महिनाभर अगोदरच पाणीकपातीची शक्यता
उरण: उरण नगरपरिषदेसह तालुक्यातील २१ ग्रामपंचायती, एनएडी, ओएनजीसी तसेच विविध औद्योगिक प्रकल्पांना पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने घट होत आहे. परतीच्या पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठा कमी होत असून, आज धरणाची पाणीपातळी ११४.६ फुटांवर आली आहे. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर नोव्हेंबर महिन्यापासून उरण तालुक्यात पाणीकपात लागू करण्याची शक्यता एमआयडीसी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Amravati News: मुले राष्ट्रीय स्तरावर पोहोचणार कशी? ग्रामीण विद्यार्थ्यांच्या क्रीडा भवितव्यावर प्रश्न, १,२८८ शाळांकडे मैदान

प्रशासनासमोर आव्हान

उरण तालुक्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक प्रकल्प आणि ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी रानसई धरणावर आहे. उरण नगरपरिषद क्षेत्रासह एनएडी, ओएनजीसी आणि इतर औद्योगिक आस्थापनांना याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे धरणातील पाणीपातळी कमी झाल्यास त्याचा परिणाम घरगुती वापरासोबतच औद्योगिक क्षेत्रावरही होण्याची शक्यता आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

गेल्या वर्षी उरण तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने ११ डिसेंबरनंतर पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने महिनाभर अगोदरच पाणीकपातीची शक्यता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे, नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात येण्याची शक्यता आहे.

जलस्रोतांवर वाढता ताण

परतीचा पाऊस लांबल्याने रानसई धरणासह तालुक्यातील विहिरी, तलाव, बंधारे आणि अन्य जलस्रोतांवरही ताण वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून, उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.

परतीच्या पावसाची प्रतीक्षा कायम

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने रानसई धरणाच्या पाणीसाठ्यावर त्याचा थेट परिणाम झाला आहे, मागील वर्षी पावसाळा लवकर सुरू झाला होता. त्यानंतर परतीचा पाऊसही उशिरापर्यंत झाल्याने रानसई धरण तब्बल तीन वेळा ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा निर्माण झाला होता. मात्र, यंदा पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने धरण क्षेत्रात परतीच्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये धरणाची पाणीपातळी ११६.६ फुटांपर्यंत होती. यंदा मात्र ही पातळी ११४.६ फुटांवर आली असून, त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही, तर उपलब्ध पाणीसाठ्यावर मोठा ताण निर्माण होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासूनच पाणीपुरवठ्यात कपात करण्याची वेळ येऊ शकते.

भातपिकावरही परिणाम होण्याची भीती

उरण तालुक्यातील शेतकरी सध्या परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भात पीक कापणीपूर्वीच्या महत्त्वाच्या अवस्थेत असून, अनेक ठिकाणी भाताच्या लोंब्या तयार झाल्या आहेत. मात्र, पुरेसा पाऊस न झाल्याने भाताच्या दाणे भरण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास अडथळा निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास भाताच्या दाण्यांची वाढ खुंटू शकते. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी भात पिकाची वाढ आणि पक्वतेची प्रक्रिया प्रभावित झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे.

पगार न दिल्याने नगरपालिका कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात पगार जमा

प्रशासनाकडून नियोजनाची गरज

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिक आणि शेतकऱ्यांकडून होत आहे. गावनिहाय पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पर्यायी जलस्रोतांची व्यवस्था करावी, तसेच पाणीवाटपाचे वेळापत्रक निश्चित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रानसई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येत्या काही दिवसांत पाऊस झाला तर परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते. मात्र, पाऊस लांबला तर नोव्हेंबरपासून उरण तालुक्यात पाणीकपात लागू होण्याची शक्यता अधिक बळावणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Uran ransai dam water level drops to 114 6 feet water cut likely from november

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती
1

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती

Chandrapur News: पावसाने पाठ फिरवली, उभी पिके वाळली;   गोंडपिपरीत दुष्काळाचे सावट, बळीराजाला आर्थिक मदतीची गरज
2

Chandrapur News: पावसाने पाठ फिरवली, उभी पिके वाळली; गोंडपिपरीत दुष्काळाचे सावट, बळीराजाला आर्थिक मदतीची गरज

Nagpur News :अन्यथा ओबीसींचे चलो दिल्ली ;२५ ऑक्टोबरला जिल्ह्यात मोर्चे
3

Nagpur News :अन्यथा ओबीसींचे चलो दिल्ली ;२५ ऑक्टोबरला जिल्ह्यात मोर्चे

Sangli News: “दुष्काळ जाहीर झाला पण शेतमजुरांचे काय?”, राष्ट्रीय कृषी कामगार महासंघाचा सवाल
4

Sangli News: “दुष्काळ जाहीर झाला पण शेतमजुरांचे काय?”, राष्ट्रीय कृषी कामगार महासंघाचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.