Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather: राज्यात ‘या’ दिवशी गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Weather Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेतीचे नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन देखील करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 25, 2024 | 04:35 PM
राज्यात 'या' दिवशी गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज (फोटो सौजन्य-X)

राज्यात 'या' दिवशी गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Weather News in Marathi : राज्यात हवामानात मोठा बदल झाला असून थंडी सोबत आता पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. यामध्ये विदर्भात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल.

शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे.

अजित पवारांचं टेन्शन वाढणार..; राष्ट्रवादीच्या आमदाराने दिला राजीनाम्याचा इशारा

28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल.

29 डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पहिला मिळेल, आणि 30 डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

पुढील तीन दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे, तसेच तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

चौदा गावांचा पाणी प्रश्न पूर्णत्वास नेला जाईल…; मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

Web Title: Rain and thundershowers are expected in the state from 27 december and 28 december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 04:35 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर;  पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज
1

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर; पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज

जोधपूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमानाच अचानक मुंबई विमानतळावर लॅडिंग; नेमकं काय घडलं?
2

जोधपूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमानाच अचानक मुंबई विमानतळावर लॅडिंग; नेमकं काय घडलं?

St Bus : गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद; ५१०३ बस फुल्ल
3

St Bus : गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद; ५१०३ बस फुल्ल

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल,  MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ
4

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.