Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन मार्चअखेरीस नागपुरात पावसाची हजेरी; 1 एप्रिलपर्यंत ढगाळ-उन्हाळी वातावरण कायम

शहरातील हवामान मिश्र स्वरूपाचे राहिले. सकाळी काही काळ ढगाळ वातावरण होते. नंतर उन्हाचा तडाखा जाणवला. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, शहराचे कमाल तापमान ३८.८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 27, 2026 | 09:36 AM
ऐन मार्चअखेरीस नागपुरात पावसाची हजेरी; 1 एप्रिलपर्यंत ढगाळ-उन्हाळी वातावरण कायम

ऐन मार्चअखेरीस नागपुरात पावसाची हजेरी; 1 एप्रिलपर्यंत ढगाळ-उन्हाळी वातावरण कायम

Follow Us
Follow Us:

नागपूर : शहरातील वाढत्या तापमानाला पुन्हा ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामानाचा अंदाज पुन्हा बदलत आहे. गुरूवारी रात्री उशिरा शहरात काही ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावली. बऱ्याच भागांत तुरळक पाऊस झाला. २७ मार्च रोजीही शहरात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.

गुरुवारी शहरातील हवामान मिश्र स्वरूपाचे राहिले. सकाळी काही काळ ढगाळ वातावरण होते. नंतर उन्हाचा तडाखा जाणवला. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, शहराचे कमाल तापमान ३८.८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३० मार्च रोजी शहरासह जिल्हा आणि विदर्भातील अनेक भागांत दिवसभर ढगाळ वातावरण राहून हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. काही भागांत तुरळक गारा पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ३१ मार्च आणि १ एप्रिलदरम्यानही अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचे संकेत दिले आहे. या काळात कमाल तापमान ३७ ते ३९ अंश तर किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

हेदेखील वाचा : हज यात्रेकरूंसाठी गुड न्यूज! नवी मुंबईत मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण

विदर्भात ३० व ३१ मार्चदरम्यान पावसासह गारा पडण्याची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रब्बी हंगामातील पिके काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत किंवा साठवण केलेल्या धान्य व उत्पादनांवर आच्छादन करावे, असे सूचविले आहे. संभाव्य पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी वेळेवर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे विभागाने नमूद केले आहे.

मुंबई आणि एमएमआर प्रदेशात उष्णतेची लाट सुरूच

मुंबई आणि एमएमआर प्रदेशात उष्णतेची लाट सुरूच आहे. सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे लोक उष्णतेच्या लाटेने त्रस्त आहेत. मुंबईत ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तीव्र उष्णतेने मुंबई आणि एमएमआर प्रदेशाला वेढले आहे. हवामान खात्याच्या मते, उपनगरांमध्ये दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, जे सामान्य तापमानापेक्षा ७.६ अंश जास्त होते. १९५६ पासून मुंबईत फक्त सहा वेळा ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक कमाल तापमान नोंदवले गेले आहे.

Web Title: Rainfall in nagpur cloudy sunny weather to persist until april 1st

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
2

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
3

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
4

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.