Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray Live: “तुमच्या कानशिलात मारली का? अजून मारली…”; मराठीच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदरमधून राज ठाकरे कडाडले

मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेवरून देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले. राज ठाकरे नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 18, 2025 | 08:47 PM
Raj Thackeray Live: “तुमच्या कानशिलात मारली का? अजून मारली…”; मराठीच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदरमधून राज ठाकरे कडाडले
Follow Us
Follow Us:

मीरा-भाईंदर: राज ठाकरे हे मीरा भाईंदर येथे दाखल झाले आहे. आज मीरा भाईंदर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळेस माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेला संबोधित केले. मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेवरून देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले. राज ठाकरे नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

मीरा रोडमधील सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “काही दिवसापूर्वी इथे जो मिठाईवाल्याचा प्रसंग घडला. आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर, कानाखाली मराठी बसणारच. विनाकारण काहीतरी काढत असतात. माझे महाराष्ट्र सैनिक पाणी प्यायला गेले. त्यांना विचारले कशासाठी मोर्चाचे काढताय? तर हिंदी सक्ती केली म्हणून मोर्चा काढतोय असे महाराष्ट्र सैनिक म्हणाले. त्यांच्या संभाषणातील त्या माणसाच्या अरेरावीमुळे त्याच्या कानफाटीत बसायची होती ती बसली. तर इकडच्या सर्व व्यापाऱ्यानी बंद पुकारला. तुमच्या मारली होती का? अजून मारली नाहीये.”

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात राहताय. शांतपणे रहा. मराठी शिका. आमचे तुमच्याशी काही भांडण नाहीये. तर इथे मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणारच. हिंदी भाषा वाईट नाही पण लादणार असाल विरोध करणार. आम्ही हिंदू आहोत. हिंदी नाही. मीरारोड ते पालघरचा पट्टा गुजरातमध्ये सामील करण्याचा डाव आहे. मुंबई महानगर प्रदेसहतील मतदारसंघ अमराठी लोकांचा डाव आहे. मुंबई गुजरातमध्ये सामील करायची हि यांची स्वप्ने आहेत.”

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “अटकेपार झेंडे फडकवले.कटकच्या किल्ल्यावर झेंडा फडकवला. तो महाराष्ट्र यांच्यासमोर हात पसरतोय? न्याय द्या म्हणून आम्ही भिका मागायच्या? स्वतःहोऊन आपल्याला काही करायची गरज नाहीये. जर अशा प्रकारे माज घेऊन कोणी अंगावर आला तर ठेचायचा म्हणजे ठेचायचाच.”

ठाकरे गट-मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

“२० वर्षांनंतर एका व्यासपीठावर आम्ही एकत्र आलो. पहिल्यांदा आम्ही मराठीच्या विषयावर एकत्र आलो. ते मी आधीच सांगितलं की आम्ही एकत्र आलोय तर ते एकत्र राहण्यासाठीच. मराठीच्या विषयावर आम्ही एकत्रच राहणार आहोत. पुढे मुद्दा येतो तो राजकारणाचा. आता कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाही. जेव्हा निवडणूक जाहीर होईल, त्यावेळी आम्ही चर्चा करू,” असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Web Title: Raj thackeray live rally in mira bhayandar protest marathi language mns maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 08:23 PM

Topics:  

  • Marathi language Compulsory
  • Meera Bhayander News
  • raj thackeray

संबंधित बातम्या

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
1

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल
2

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल

‘राम मंदिरातील देणग्यांच्या हिशोबावर प्रश्नचिन्ह’; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप, केंद्र सरकारवरही साधला निशाणा
3

‘राम मंदिरातील देणग्यांच्या हिशोबावर प्रश्नचिन्ह’; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप, केंद्र सरकारवरही साधला निशाणा

संघाच्या कार्यक्रमावरून झालेल्या टीकेला विश्वास नांगरे पाटलांचे उत्तर; “सेवा शर्तींचे कोणतेही उल्लंघन केले नाही”
4

संघाच्या कार्यक्रमावरून झालेल्या टीकेला विश्वास नांगरे पाटलांचे उत्तर; “सेवा शर्तींचे कोणतेही उल्लंघन केले नाही”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.