Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात वाळूज एमआयडीसीतील बजाज ऑटो कंपनीवर 'कमवा अन् शिका'च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन! राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 12, 2026 | 01:50 PM
बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन

Follow Us
Follow Us:
  • बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन
  • राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!
  • वाचा सविस्तर बातमी!
छत्रपती संभाजीनगर: वाळूज एमआयडीसीतील बजाज ऑटो कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘कमवा अन् शिका’ योजनेतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन सुरू केले. तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेशच झाले नसल्याने त्यांना पदवी मिळाली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. विद्यार्थ्यांना कामगारांप्रमाणे काम करून घेऊन केवळ स्टायपेंड देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. पात्र विद्यार्थ्यांना तातडीने पदवी देण्याची मागणीही आंदोलकांनी केली. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मध्यस्थी बजाज आणि विद्याथ्यांमध्ये समेट घडवून आणला. मागण्यांवर सकारात्मक तोडगा आश्वासन दिल्यानंतर काढण्याचे विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाज ऑटो कंपनीच्या प्लांटसमोर मंगळवारी सकाळी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. ‘कमवा आणि शिका’ या योजनेच्या माध्यमातून कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर डिग्री देण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक विद्याथ्यांचे अद्याप प्रवेशच झालेले नाही, तर ज्या विद्याथ्यांचे प्रवेश झाले त्यांचा तीन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होऊनही त्यांना डिग्री दिलेली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

आंदोलनात प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सहभागी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनीदेखील मोठ फौजफाटा तैनात केला होता. सलग तीन वर्षे राबवूनही डिग्री मिळत नसल्याने तसेच प्रवेश, कागदपत्रांच्या गोंधळामुळे आपले भवितव्य टांगणीला लागल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडले. यामुळे कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. २०२४ मध्ये अनेक विद्यार्थ्यांची कागदपत्रे नामंजूर झाली होती, मात्र त्याची माहिती त्यांना देण्यात आली नाही. ही बाब जुलै २०२६ मध्ये समोर आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पात्र विद्यार्थ्यांना पदवी देण्याची मागणी आंदोलकांनी केली.

चर्चेनंतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली. आंदोलनाची दखल घेत मनसे पदाधिकारी, बजाज ऑटोचे प्रतिनिधी, आउटसोर्सिंग कंपनी ‘टीमलीज’चे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्यात एक संयुक्त बैठक पार पडली. विद्याथ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर ‘टीमलीज’ कंपनीने मनसेच्या पदाधिकाऱ्याना लेखी पत्र दिले असून, विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या पदवी आणि इतर हक्काच्या प्रश्नांवर अंतिम तोडगा काढण्यासाठी बजाज कंपनीचे सर्वेसर्वा राजीव बजाज हे येत्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. या विषयावर अधिक सविस्तर चर्चा करण्यासाठी पुढील चार दिवसांनंतर एक महत्त्वाची बैठक नियोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Web Title: Chhatrapati sambhajinagar bajaj auto waluj protest raj thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • MIDC
  • Protest
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Spain Housing Crisis : गृहनिर्माण संकटाने स्पेनमध्ये संताप; आंदोलकांची सरकारकडे तातडीच्या कारवाईची मागणी
4

Spain Housing Crisis : गृहनिर्माण संकटाने स्पेनमध्ये संताप; आंदोलकांची सरकारकडे तातडीच्या कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.