Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: राज्यात सध्या पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीकरणावरून राजकारण तापलं आहे. येत्या सात जुलैला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचा मोर्चा निघणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या मोर्च्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनी दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र येणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मोर्चाकडे राहणार आहे. हे सर्व सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
“महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!,” असे ट्विट करत संजय राऊत यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. हिंदी भाषा सक्तीकरणाविरोधात राज ठाकरेंची मनसे पाच जुलैला मोर्चा काढणार असून या मोर्चात उद्धव ठाकरेदेखील सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे सात तारखेला कृती समितीच्या मोर्चात सहभागी होणार होते. पणत्यांनी अचाकन निर्णय बदलला, त्यामुळे असं नेमकं काय घडलं, असा प्रश्न उपस्थित होत असताना संजय राऊत यांनी याचा खुसाला केला आहे.
संजय राऊत म्हणाले, मातोश्रीवर आम्ही आम्ही कृती समितीच्या आंदोलनात सहभागी होण्याची तारीख जाहीर केली होती. त्यावेळी आमची बैठक सुरू होती. पण बैठकीतून बाहेर आल्यानंतर मला राज ठाकरे यांचा फोन आला आणि त्यांना येत्या सात तारखेला आंदोलन करायचे ठरवल्याचे सांगितले. तर मी सहा तारखेची घोषणा केल्याचे त्यांनी सांगितले. पण मराठी माणसाचे आणि मराठी भाषेसंदर्भात दोन मोर्चे निघणं हे बरं दिसणार नाही, जर एकत्र आंदोन झाले तर तो जास्त प्रभावी ठरेल आणि मराठी भाषिकांनाही त्याचा आनंदच होईल.
संजय राऊत म्हणाले, मी लगेच उद्धवजींना मनसे प्रमुख राज ठाकरेंचा फोन आल्याचे सांगितले. त्यांना राज ठाकरे यांची भूमिका सांगितली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीदेखील मराठी माणसाचे ऐक्य दिसणे गरजेचे आहे. आपण मराठी माणसं मराठी भाषेसाठी आणि हिंदी सक्तीकरणाच्या विरोधासाठी एकत्र आहोत, ही माझी भूमिका आहे आणि त्यासाठी वेगळा मोर्चा काढण्याची गरज नाही, असं उद्धवजींनी सांगितलं.
राज्यात शालेय शिक्षणात हिंदी सक्तीच्या विरोधात निघणाऱ्या मोर्चाच्या तारखेत बदल करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येण्याची शक्यता आता जवळपास निश्चित झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात स्पष्ट माहिती दिली.
“उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले की, ६ जुलैला आषाढी एकादशी असल्याने त्या सणाच्या पार्श्वभूमीवर ७ तारखेची तारीख ठरवली होती. राज्यभर आषाढीचा उत्सव असतो. त्यामुळे मराठी माणसापर्यंत आंदोलन पोहोचवणे कठीण होईल. आपण ५ किंवा ७ तारखेला एकत्र येऊन मोर्चा काढू शकतो,” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
राऊत म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंची भूमिका राज ठाकरेंना फोन करून सांगितली. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि परत मला फोन करून ५ जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय कळवला.”
“राज ठाकरेंना सरकारची भूमिका पटलेली नाही”
संजय राऊत म्हणाले, “आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. पण महाराष्ट्रात शालेय शिक्षणामध्ये जबरदस्तीने हिंदी लादणे योग्य नाही. याबाबत अनेक मराठीप्रेमी संस्था एकत्र आल्या आहेत आणि त्या काम करत आहेत.मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या संस्था राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांना भेटल्या आहेत. सरकारकडून हिंदी अंमलबजावणीबाबत सादर करण्यात आलेली माहिती राज ठाकरेंना बहुधा समाधानकारक वाटलेली नाही,” असेही राऊत यांनी नमूद केले.