१९ इनोव्हामध्ये भरले 20 लीटर डिझेल, पण निघालं १० लीटर पाणीच पाणी...,पेट्रोल पंप केलं सील (फोटो सौजन्य-X)
Madhya Pradesh Ratlam MP CM Mohan Yadav In Marathi : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील सुमारे १९ वाहने अचानक थांबली. दोसीगावच्या पेट्रोल पंपावरून सर्व वाहने डिझेलने भरण्यात आली होती. मात्र या डझेलमध्ये भेसळीच्या संशयामुळे पेट्रोल पंपही सील करण्यात आला आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया…
मध्य प्रदेशातील सर्व वाहने प्रादेशिक औद्योगिक शिखर परिषदेसाठी इंदूरला आली होती. वाटेत दोसीगाव येथील भारत पेट्रोलियमच्या शक्ती इंधन पेट्रोल पंपावर थांबली. त्यानंतर प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. या तपासादरम्यान पोलिसांनाही एक धक्कादायक प्रकरण समोर आले. डिझेलमध्ये पाण्याची भेसळ आढळून आली आहे. या पाण्यात मिसळलेल्या डिझेलमुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचे इंजिन निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारवाई करत पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे. इंदूरहून इतर वाहने मागवण्यात आली होती. येथे पेट्रोल पंप व्यवस्थापकाने पावसात पाणी गळती झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणाची सविस्तर चौकशीनंतर हे प्रकरण स्पष्ट होईल.
या प्रकरणात नायब तहसीलदार आशिष उपाध्याय म्हणाले की, पावसामुळे पेट्रोल पंपाच्या टाकीमध्ये पाणी गळती होण्याची शक्यता आहे. अन्न आणि पुरवठा विभागाने पेट्रोल पंप सील केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला जाईल.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत आज (27 जुलै) रतलाम येथे प्रादेशिक उद्योग, कौशल्य आणि रोजगार परिषद २०२५ आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी गुरुवारी रात्री इंदूरहून १९ वाहने मागवण्यात आली होती. रतलाममधील दोसीगाव येथील पेट्रोल पंपावरून या वाहनांमध्ये डिझेल भरले जात असताना, थोड्या अंतरावर पोहोचल्यानंतर, एक-एक करून सर्व वाहने थांबली, ज्यामुळे प्रशासनाला धक्का बसला. प्रशासन रात्री पेट्रोल पंपावर पोहोचले आणि तपासणी केली आणि पेट्रोल पंप सील केला. वाहनांच्या टाक्या उघडून तपासणी केली असता, डिझेलसह पाणीही बाहेर आले. गाडीत २० लिटर डिझेल भरले असता त्यात १० लिटर पाणी बाहेर आल्याचे आढळून आले. सर्व वाहनांमध्ये ही परिस्थिती दिसून आली. रात्री अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पेट्रोल पंप सील करण्यात आला. त्यानंतर इंदूरहून इतर वाहनांची व्यवस्था करण्यात आली.