मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरी पूर्व निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन केले. यावर शिवसेनेच्या मुंबईतील माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपने धसका घेतला ही त्यांची खेळी असल्याचे आज टीकास्त्र सोडले.
पेडणेकर म्हणाल्या, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंचे आभार नक्कीच मानते, पण आज पत्र लिहिले त्यानंतर जे काही रिपोर्ट आले. त्यानंतर भाजपने धसका घेतला असेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सांगत आले की, संस्कृती जपूया. या महाराष्ट्राचे संस्कार जपूया.
या महाराष्ट्राच्या चांगल्या राजकारणाचा ऱ्हास होऊ देऊ नये. पण काहीका असेना राज ठाकरेंनी उशीरा का होईना पण पत्र दिले. राज ठाकरेंना संस्कृती आणि संस्कार शिकवण्याएवढी वेळ नक्की नाही. पेडणेकर म्हणाल्या, राज ठाकरेंनी दिलेल्या पत्रामुळे भाजपला आता कळले की, आपण राज्यातील आपण आपल्या संस्कृती आणि संस्काराचा किती ऱ्हास करतोय.