रामदास आठवलेंची भाजपकडे मोठी मागणी; म्हणाले, पुण्याचे महापौरपद अन्...
पुणे : भाजप आमचा नैसर्गिक मित्र आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे नंतर आलेत त्यामुळे भाजपने आम्हाला डावलू नये आणि भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्हाला योग्य न्याय देईल, असा विश्वास आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकाही महायुतीने एकत्रित लढाव्या तसेच पुणे महापालिकेत आम्हाला भाजपने १५ ते २० जागा आणि महापाैरपद द्यावे, असे आरपीआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परीषदेत नमूद केले.
पुण्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत विचारले असता, सदर बाब न्यायालयात प्रलंबित आहे. पण एप्रिलच्या शेवटच्या महिन्यात किंवा मेमध्ये महापालिका निवडणूका होण्याची शक्यता आठवले यांनी व्यक्त केली. महापालिका निवडणुकीत मागच्या वेळी आम्हाला 5 जागा मिळाल्या होत्या. आता महायुती असली तरी यंदाच्या महापालिका निवडणुकीत कोणकोण भाजप सोबत राहतील यात शंका आहे. मात्र आरपीआय हा भाजपचा मूळ मित्रपक्ष असल्याने आम्ही पालिका निवडणुकीतही भाजप सोबतच राहणार आहोत. तसेच महापौर पद अनुसूचीत जातीसाठी आरक्षित असल्यास ते आरपीयआयला मिळावे, अशी मागणी आठवले यांनी केली. भाजपने जरी स्वबळाचा नारा दिला तरी त्यांना पुणे महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी आमच्याशिवाय त्यांना पर्याय नाही. त्यामुळे आम्ही पालिका निवडणुकीतही भाजप सोबतच राहणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, महेंद्र कांबळे, शैलेश चव्हाण, विरेन साठे, श्याम सदाफुले, महिपाल वाघमारे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, विशाल शेवाळे, उमेश कांबळे आदी उपस्थित हाेते.
आणखी काय म्हणाले आठवले ?
सरपंच संताेष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ आराखाडयासाठी राज्य सरकारने 1० काेटी रुपये द्यावेत. उमेदवारी देतानाच उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र असल्याची पक्षांनी खातरजमा करावी, असंही आठवले यावेळी म्हणाले.
नीतिशकुमार आम्हाला सोडणार नाहीत
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारमध्ये असलेले नितेश कुमार हे भाजपची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना यबाबत विचारलं असता ते म्हणाले की, नितीश कुमार बदल तुम्हाला जास्त माहीत आहे. मी काय सांगणार पण नीतिशकुमार आम्हाला सोडून जाणार नाहीत. त्यांची आम्हाला आवश्यकता असून, आम्ही त्यांना जाऊ देणारं नाही, अस यावेळी रामदास आठवले म्हणाले.