Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकनाथ शिंदेची नाराजी दूर होणार? महायुतीतील तिढा सोडवण्यासाठी रामदास आठवलेंनी सूचवला उपाय

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महत्वाचा उपाय सूचवला आहे. त्याद्वारे महायुतीमध्ये असलेला तिढा सुटू शकतो. तसेच त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतही भाष्य केले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 03, 2024 | 07:33 PM
एकनाथ शिंदेची नाराजी दूर होणार? महायुतीतील तिढा सोडवण्यासाठी रामदास आठवलेंनी सूचवला उपाय
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र विधानसभा निकाल लागून दहा दिवस झाले. शपथविधीच्या तारखेचीही घोषणा झाली मात्र तरीही मुख्यमंत्री कोण होणार हे गुलदस्तात आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सध्या मोठा तिढा निर्माण झाला आहे. आता एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर होण्यासाठी आणि महायुतीमधील तिढा सोडवण्यासाठी आरपीआय पक्षप्रमुख केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

रामदास आठवले यांनी सूचवला उपाय

आठवले यांनी सांगितले की, माझे मत आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकार केले होते. त्यानुसार आता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची संधी घ्यावी. जर ते हे पद स्वीकारण्यास तयार नसतील तर त्यांना महायुतीचे अध्यक्ष बनविले पाहिजे किंवा ते केंद्रात येऊ शकतात.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून निवडले जातील

रामदास आठवले यांनी सांगितले की, भाजपच्या वरिष्ठांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले की ते त्यांना मुख्यमंत्री पद देण्यास तयार नाही आहेत. कारण मागील अडीच वर्षांचा कार्यकाल शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून दिला गेला होता. भाजपचे मत आहे की मुख्यमंत्री हा भाजपचाच असावा आणि उमेदवार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव असले पाहिजे, मात्र त्यांनी अधिकृतपणे याची घोषणा केलेली नाही. तसेच आठवले यांनी मुख्यंमंत्रीपद कोणाला मिळावे या करिता आपले मतही मांडले ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही केले त्यांना मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे.त्यामुळे ते मुख्यमंत्री म्हणून निवडले जातील असे मला वाटते.

मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार हे उद्या कळणार

महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे जवळजवळ निश्चित आहे. मात्र तो नेमका कोण असेल हे अजूनही सांगता येत नाही. उद्यापर्यंत या नावाची घोषणा केली जाणार आहे. याकरिता अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे निरीक्षक आहेत. ते यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

देवेंद्र फडणवीसांचे नाव आघाडीवर मात्र भाजप करु शकतो धक्कातंत्राचा वापर

देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असले तरी गेल्या आठवड्याभरात अनेक नांवांची चर्चा केली गेली आहे. त्यामध्ये पुण्याचे खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री रविंद्र चव्हाण  यांचा समावेश आहे.भाजप मुख्यमंत्रीपदासाठी मराठा कार्ड खेळू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत असल्याने या चर्चांना जोर आला आहे.  मुरलीधर मोहोळ आणि रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत चर्चा वायफळ असल्याचे जाहीर केले. राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये भाजपने धक्कातंत्राचा वापर करत नवख्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती. त्यामुळे आता उद्या काय घोषणा होणार याची सर्वत्र चर्चा आहे.

Web Title: Ramdas athawale said that the indisposed eknath shinde should be made the president of the mahayuti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 07:33 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti
  • Ramdas Athawale

संबंधित बातम्या

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर
1

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
3

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले
4

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.