Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नांदगाव दशक्रोशीत श्रीराम प्रतिष्ठापणे निमित्त ‘राममय वातावरण’

नांदगांव येथील राममंदिरात आ. नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तसेच श्रीराम प्रतिष्ठापणेचे थेट प्रक्षेपण रामभक्तांना दाखविण्यात आले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 22, 2024 | 06:16 PM
नांदगाव दशक्रोशीत श्रीराम प्रतिष्ठापणे निमित्त ‘राममय वातावरण’
Follow Us
Follow Us:

अयोध्यानगरीत श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीरामाच्या मुर्ति प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने नांदगाव दशक्रोशीतील श्री राम भक्तांच्या वतीने श्रीराम यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नांदगांव येथील राममंदिरात आ. नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तसेच श्रीराम प्रतिष्ठापणेचे थेट प्रक्षेपण रामभक्तांना दाखविण्यात आले. या मिरवणुकीत राम मुर्ती असलेला सजवलेला रथ, भगव्या टोप्या, भगवे कुर्ते, भगवे झेंड्यांमुळे सर्वत्र राममय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी जय श्री राम, प्रभु रामचंद्र की जयचा श्रीराम भक्तांनी केला जयघोष करत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीरामाच्या मुर्ति प्राणप्रतिष्ठापना होण्यापूर्वी नांदगांव तिठा येथे श्रीरामाच्या भव्य मिरवणूकीचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. या मिरवणूकीत ५०० हून अधिक मोटारसायकल स्वार, रिक्षा, कार, मालवाहतूक वाहने भरुन रामभक्तांनी सहभाग घेतला. जय श्रीरामचा जयघोष करत ही मिरवणूक नांदगांव तिठा ते नांदगाव मोरये वाडी येथील श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा मिरवणूक पुढे जात नांदगांव गोसावी वाडी – कुंभार वाडी येथील श्रीराम मंदिरात आ. नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती करुन रामनामाचा जयघोष करण्यात आला.

त्यानंतर भव्य मिरवणूक नांदगाव येथील ब्रिज खाली गेल्यानंतर LED TV स्क्रीनवर रामभक्तांना अयोध्यायेथील श्रीराम प्रतिष्ठापणासोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यावेळी रामभक्तांनी मनोभावे श्रीरामाची महाआरती करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी श्रीराम प्रतिष्ठापणा होताच जोरदार फटाक्यांची आतिषबाजी व घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा मिरवणूक तोंडवली येथील श्री हनुमान मंदिर पर्यंत नेण्यात आली. त्याठिकाणी रामभक्तांनी महाआरती करत समारोप केला. त्यानंतर सर्व रामभक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.

सुमारे 500 वर्षानंतर हा आलेला दिवस सुवर्ण योग असल्याने नांदगाव दशक्रोशीतील श्री राम भक्तांनी ग्रामदेवता मंदिर, गणेश मंदिर, दत्त मंदिर व विविध मंदिरांमध्ये आरती, नाम जप व धार्मिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात नांदगाव, असलदे, कोळोशी, आयनल,तोंडवली – बावशी ,ओटव , बेळणे, सावडाव, माईण आदी दशक्रोशीतील सर्व श्री रामभक्तांनी सहभाग घेतला.

Web Title: Rammay atmosphere in honor of shri ram in nandgaon daskroshi maharashtra political party maharashtra government nandgaon nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2024 | 06:16 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Nashik
  • Nashik News Update

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य
1

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय
2

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
3

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

विष प्राशन करूनही जीव वाचवण्याची धडपड; रुग्णालयाच्या पायऱ्यांवर पतीने सोडले, नाशिकमधील घटनेने खळबळ
4

विष प्राशन करूनही जीव वाचवण्याची धडपड; रुग्णालयाच्या पायऱ्यांवर पतीने सोडले, नाशिकमधील घटनेने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.