Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विष प्राशन करूनही जीव वाचवण्याची धडपड; रुग्णालयाच्या पायऱ्यांवर पतीने सोडले, नाशिकमधील घटनेने खळबळ

विष प्राशन केल्यानंतर जीव वाचवण्यासाठी एक महिला स्वतः गाडी चालवत रुग्णालयात पोहोचली; मात्र, पुढे जे घडले ते धक्कादायक होते. उपचारासाठी पैसे देण्यास नकार देत पतीने तिला रुग्णालयाच्या पायऱ्यांवरच सोडून पलायन केल्याचा आरोप आहे. नाशिकमधील या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून, तपासात छळाचे धक्कादायक आरोप समोर आले आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 07, 2026 | 09:23 AM
विष प्राशन करूनही जीव वाचवण्याची धडपड; रुग्णालयाच्या पायऱ्यांवर पतीने सोडले, नाशिकमधील घटनेने खळबळ

विष प्राशन करूनही जीव वाचवण्याची धडपड; रुग्णालयाच्या पायऱ्यांवर पतीने सोडले, नाशिकमधील घटनेने खळबळ

Follow Us
Follow Us:
  • फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव; विवाहितेने विष प्राशन केले
  • विष घेतल्यानंतर स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठले; पतीचा पलायनाचा आरोप
  • पतीसह सात जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा; पतीला अटक

नाशिक : नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विष प्राशन केल्यानंतरही जीव वाचवण्यासाठी संबंधित महिलेने स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठले. मात्र, उपचाराचा खर्च करण्यास नकार देत पतीने तिला जिल्हा रुग्णालयाच्या पायऱ्यांवर गंभीर अवस्थेत सोडून पलायन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पतीला अटक करण्यात आली आहे. दीपाली अनिल पवार (वय ३२, रा. क्लासिक निकेतन अपार्टमेंट, महात्मानगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेला तिचा पती अनिल पवार याला सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक न्यायालयाने त्याला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव

मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली यांनी स्वतःच्या कमाईतून अहिल्यानगर येथे फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट दीर सुनील याच्या नावावर करण्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींकडून त्यांच्यावर सातत्याने दबाव आणला जात होता. या त्रासाला कंटाळून दीपाली यांनी विष प्राशन केले. विष घेतल्यानंतर त्यांनी स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठले. मात्र, पती अनिलने उपचारासाठी लागणारे पैसे भरण्यास नकार दिला. त्यानंतर गंभीर अवस्थेतील दीपाली यांना जिल्हा रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडून तो निघून गेल्याचा आरोप आहे.

पगाराचे एटीएम कार्ड पतीकडे

दीपाली या जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती अनिल हे यापूर्वी एसआरपीएफ, दौंड येथे कार्यरत होते. सध्या ते नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. अनिलने दीपाली यांच्या पगाराचे एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून त्यांच्या खात्यातील पैसे काढून घेतल्याचा आरोप आहे. सात वर्षांच्या मुलाच्या शिक्षणासाठी दीपाली यांनी एटीएम कार्ड परत मागितल्यानंतर त्यांचा छळ वाढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण

दीपाली यांच्या कामाच्या ठिकाणाहून फोन आल्यास अनिल त्यांच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता. त्यातून त्यांच्याशी वाद घालून मारहाण केली जात असल्याचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून दीपाली यांनी यापूर्वी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती. विष प्राशन केल्यानंतर दीपाली यांनी वडिलांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी त्यांचा मुलगा भूषण याला तातडीने नाशिकला पाठवले. भूषणने दीपाली यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

पतीसह सात जणांवर गुन्हा

दीपाली यांचे वडील सयाजी गायकवाड (रा. त्र्यंबक) यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात पती अनिल पवार, सासू सुशिला, सासरे सोन्याबापू, दीर सुनील, जाऊ सुवर्णा, ननंद रेखा धोत्रे आणि नंदोई किशोर धोत्रे (सर्व रा. घारगाव, श्रीगोंदा) अशा सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे करीत आहेत.

Web Title: Nashik police husband harassment wife suicide satpur police sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • Crime Police
  • Domestic Violence
  • Husband and wife
  • maharashtra crime cases
  • Nashik News Update

संबंधित बातम्या

जळगावच्या लोंणजे गावातील घटनेने खळबळ; छेडछाडीवरून दोन गट भिडले; लाठ्या-काठ्यांनी तुफान हाणामारी
1

जळगावच्या लोंणजे गावातील घटनेने खळबळ; छेडछाडीवरून दोन गट भिडले; लाठ्या-काठ्यांनी तुफान हाणामारी

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral
2

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
3

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर
4

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.