Physical Harassment
पुणे : ओळख निर्माण करून महाविद्यालयीन तरुणीशी प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण केले. त्यानंतर या तरुणीला एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape on Girl) केला. इतक्यावरच हे थांबलं नाही तर शरीरसंबंधाचे व्हिडिओ काढून त्याद्वारे तिला लग्नासाठी ब्लॅकमेल केले. मात्र, तिने लग्नाला नकार दिल्यानंतर देखील तिला जबरदस्तीने सोलापूर येथे नेऊन त्याठिकाणी एका मंदिरात लग्नही केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी नागेश राजू चव्हाण (२३, आंबेगाव बुद्रुक) याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत 19 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. पीडित तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेते. नागेशने तरुणीशी ओळख केली. त्यानंतर तिला प्रेम असल्याचे सांगत प्रेमसंबंध निर्माण केले. यानंतर तरुणीला पुणे-सातारा रस्त्यावरील लॉजमध्ये नेले. तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. याचे फोटो व व्हिडिओ काढले. ते फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरूवात केली.
यानंतर नागेशने तरुणीला लग्नाची मागणी घातली. मात्र, तिने नकार दिला. त्यावेळी त्याने ‘मी फिनेल पिऊन जीव देईन’ अशी धमकी देत तरुणीला जबरदस्तीने सोलापूर येथे नेऊन तिच्याशी लग्न केले. तरीही तरुणी संधी मिळताच वडिलांकडे निघून आली. त्यानंतर या तरुणाने तिला ब्लॅकमेल करून पुन्हा नांदण्यासाठी येण्याबाबत धमकी दिली.