यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महिला प्रेक्षकाच्या साडीत उंदीर शिरल्याचा प्रकार घडला (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : शहरातील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मंचावर नाटक सुरु असताना प्रेक्षकांमध्ये एकच गदारोळ सुरु झाला. याचे कारण ठरला तो एक उंदीर. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये हा प्रकार घडला आहे. अचानक एक उंदीर सभागृहात घुसला. यामुळे चालू असलेले नाटक मध्येच थांबवावे लागले. या प्रकरणाची चर्चा पुण्यामध्ये जोरदार रंगली आहे.
पुणे शहरातील कोथरुड भागामध्ये असणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अनेकदा उंदीर दिसत असतात. पण जरी सभागृहात उंदीर नियमितपणे दिसत असले तरी, यावेळी एका महिला प्रेक्षकाच्या साडीमध्ये उंदीर शिरला. यामुळे प्रेक्षक वर्गामध्ये थोडी चलबिचल दिसून आली. यामुळे नाटक मध्यांतच बंद करावे लागले. सुमारे २० मिनिटांनंतर, उंदीर पकडून बाहेर काढण्यात आला, तेव्हा महिला प्रेक्षकाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
‘माय रंगभूमी’ या इन्स्टाग्राम हँडलने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘एक उंदीर अचानक एका महिला प्रेक्षकाच्या साडीत घुसला.’ ती स्वाभाविकच घाबरली होती, पण नाटकात व्यत्यय येऊ नये म्हणून ती सभागृहाबाहेर पळून गेली. तिच्या पतीनेही कठीण परिस्थिती मोठ्या संयमाने हाताळली. सभागृहात फारसा गोंधळ नव्हता, पण उंदीर बाहेर काढण्यासाठी सुमारे २० मिनिटे लागली. हा वेळ धावपळ, मानसिक ताण आणि अस्वस्थतेत गेला, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
उंदरांचा बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे
तसेच पुढे लिहिले आहे की, नशिबाने तो उंदीर महिलेला चावला नाही. परंतू त्याची धारदार नखे महिलेला लागल्यामुळे इन्फेक्शन टाळण्यासाठी इंजेक्शन द्यावे लागले. ही अतिशय गंभीर बाब आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाने त्वरित याची दखल घेऊन उंदरांचा बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी या पोस्टद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहामध्ये अनेक कार्यक्रम आणि नाटके होत असतात. या घटनेनंतर पुणे महानगरपालिका जागे झाली आहे आणि त्यांनी थिएटर स्वच्छ करण्याची जबाबदारी घेतली आहे. याबाबत प्रेक्षकांना आणि कलाकारांना त्रास होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करायला हव्यात, असे नाट्यगृह व्यवस्थापक सत्यजित धांडेकर यांनी सांगितले. या उंदीर नाटकामुळे यशवंतराव चव्हाण रंगमंचाची अवस्था उघडकीस आली आहे. पुण्यातील प्रमुख थिएटरपैकी एक असलेल्या या जागेवरही उदासीनतेचा बळी पडल्याबद्दल टीका केली जात आहे
रस्त्यावरील खड्डे बुजवले जाणार
महापालिकेच्या विविध विभागांना सेवा वाहिन्या टाकण्यासाठी पावसाळ्यापूर्वी रस्ते खोदाईची परवानगी देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या सर्व मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्व संबंधित विभागांच्या पथ विभागाकडून दिलेल्या रस्ते खोदाई परवानगीच्या सर्व ठिकाणच्या तसेच प्रमुख रस्त्यावरील ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. काही अपवाद वगळता बहुतांश विभागांचे काम झालेले असून, रस्ते पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. या सर्व खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी जास्त मनुष्यबळ वापरून हे काम 7 जूनपर्यंत पूर्ण करा, असे आदेश दिवटे यांनी दिले आहेत






