Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: रत्नागिरीतील मतदार यादीत होणार लवकरच दुरुस्ती; हरकतींचा आकडा तब्बल…

शहरातील ७ हजार ५०० मतदारांबाबत पालिकेकडे हरकती दाखल झाल्या. यामध्ये अनेक मतदार या प्रभागातील दुसऱ्या प्रभागात, जिथे राहतो त्या प्रभागात नावच नाही अशा तक्रारी होत्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2025 | 04:57 PM
Ratnagiri News: रत्नागिरीतील मतदार यादीत होणार लवकरच दुरुस्ती; हरकतींचा आकडा तब्बल…
Follow Us
Close
Follow Us:

साडेसात हजार मतदारांवरील हरकती निकाली
सात हजार ५०० मतदारांवर हरकती झाल्या दाखल
रत्नागिरी शहराची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

रत्नागिरी: आगामी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहराची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये सुमारे ७४ हजाराच्यावर मतदार आहेत. त्यापैकी ७हजार ५०० मतदारांवर हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. याबाबत पालिकेने स्थळ पाहणी करून हरकती निकाली काढल्या. तशी मतदार यादीमध्ये दुरूस्ती करण्यास सांगितली आहे. साडेतीनशे मतदारांवर आक्षेप असून, त्यांना पालिकेने बाजू मांडण्यासाठी नोटिस बजावली होती. त्याची आज प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्याकडे सुनावणी इरालो. त्यानुसार मतदार यादीमध्ये बदल करून ३१ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघाच्या यादीवरच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी आक्षेप घेतला आहे. सुमारे २३ हजार मतदार बोगस असल्याचा दावा त्यांनी केला. पुराव्यानिशी त्यांनी ही सर्व माहितीवजा तक्रार जिल्हा निवडणूक विभागाकडे केली. त्यानंतर रत्नागिरी शहरातही मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याची तक्रारही त्यांनी केली होती. या दरम्यान, पालिकेने शहरातील मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. सुमारे ७४ हजारावर मतदार आहेत. यासाठी हरकती मागवण्यात आल्या.

परिषदेची निवडणूक लवकरच होणार

रत्नागिरी नगर परिषदेच्या १६ प्रभाग अर्थात ३२ वॉर्ड साठी येत्या काही कालावधीत निवडणूक होणार आहे आणि त्याची तयारी याचा राजकीय पक्षाझरे जोरदार सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरीतील ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असून पालकमंत्री उदय सामंत यांच्या मतदार सधातील ही महत्वाची जिल्ह्याचे ठिकाण असलेली नगरपरिषद आहे. यावेळी क नगरपरिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे परंतु इच्छुकांची गर्दी असल्यामुळे भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढती होणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

३१ ऑक्टोबरला  अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

आता साडेतीनशे मतदारांवर हरकती घेण्यात आल्या आहेत. त्यांना पालिकेने नोटीस बजावली आहे. त्यांची आज प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्याकडे सुनावणी झाली, त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला रत्नागिरी शहराची अतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Sangmeshwar बसस्थानकाची उडाली वानवा! हिरकणी कक्ष कुलूपबंद तर उपहारगृह…

पालिकेने केला हरकतींचा अभ्यास

शहरातील ७ हजार ५०० मतदारांबाबत पालिकेकडे हरकती दाखल झाल्या. यामध्ये अनेक मतदार या प्रभागातील दुसऱ्या प्रभागात, जिथे राहतो त्या प्रभागात नावच नाही अशा तक्रारी होत्या. काही ठिकाणी पालिकेच्या चुकीमुळे एका प्रभागातील मतदारांची नावे दुसन्या प्रभागात लागली होती. पालिकेने हरकतीचा अभ्यास करून अनेक ठिकाणी केली. त्यानुसार यादीमध्ये सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत.

Web Title: Ratnagiri city draft voter list released objections filed against 7500 voters about local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 04:57 PM

Topics:  

  • Local Body Election 2025
  • Ratnagiri
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri : कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार- नारायण राणे
1

Ratnagiri : कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार- नारायण राणे

राजकीय पक्षांकडून पैलवानांची चाचपणी! ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्तेही निवडणूक रिंगणात उतरणार
2

राजकीय पक्षांकडून पैलवानांची चाचपणी! ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्तेही निवडणूक रिंगणात उतरणार

Local Body Elections 2025: मनपा निवडणुसाठी महायुतीसाठी भाजपाचे आस्तेकदम! ५७ जागांमध्ये तडजोड करून मित्रपक्षांना सोबत घेणार का?
3

Local Body Elections 2025: मनपा निवडणुसाठी महायुतीसाठी भाजपाचे आस्तेकदम! ५७ जागांमध्ये तडजोड करून मित्रपक्षांना सोबत घेणार का?

मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT विनाच; निवडणूक आयोगाने म्हटले…
4

मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT विनाच; निवडणूक आयोगाने म्हटले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.