संगमेश्वर बसस्थानकाची उडाली वानवा (फोटो- सोशल मीडिया)
संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय
संयमाची प्रतीक्षा न पाहण्याचा प्रवाशांचा इशारा
संगमेश्वर बसस्थानकात उपाहारगृहाची सोय नाही
संगमेश्वर: संगमेश्वर है तालुक्याचे ठिकाण, तसेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एसटी महामंडळचे मध्यवर्ती बसस्थानक आहे. या ठिकाणी असलेल्या बसस्थानकाचे विकास काम जवळजवळ पूर्ण झाले, मात्र मुहूर्ताची प्रतीक्षा असावी म्हणूनच की काय लोकार्पण सोहळा थांवला आहे. जरी लोकार्पण झाले नसले वाहतूक नियंत्रण, प्रवास सवलत पास कक्ष सुरु असून एवढेच नव्हे तर प्रवासी बैठक व्यवस्था ही सुरु असून या स्थानकातून प्रवाशांचे आवागमन होते आहे.
या स्थानकात येणाऱ्या -जाणाऱ्या एसटी गाड्यांची संख्या जास्त असून, रात्रंदिवस प्रवाशांची या ठिकाणी वर्दळ व एसटीच्या प्रतीक्षेसाठी थांबलेल्यांची गर्दी असते. मात्र नव्याने उभारण्यात आलेल्या एसटी स्थानकच्या ठिकाणी असलेले उपहारगृह कुलूप बंद असल्याने रात्रीच्या वेळी, पहाटे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना जेवण, चहा नाश्ता या सुविधांची सोय नसल्याने बोंब असते.
डोळेझाक नेमके कोण करतेय?; प्रवाशांचा सवाल
स्थानकाबाहेर आपल्या साडीने काही लोक दुकाने सुरू करतात. पण त्याठिकाणी उभ्या उभ्याच चहा नाश्ता करायला भाग पडते. जेवण या सुविधेची तर वाताहात झाली आहे.
जर एसटी उहारगृह सुरू जाते तर या समस्येपासून प्रवाशांना दिलासा मिळाला असता, तालुक्याच्या आमसभेत सुद्धा उपहारगृह बंद असल्याचा विषय चांगलाच गाजला यावेळी अधिकाऱ्याकडून थातूरमातूर उत्तर देऊन त्यावर पडदा पाडण्यात आला.
MSRTC News: ‘लालपरी’ला दिवाळीमध्ये ‘लक्ष्मी’ दर्शन; ‘या’ विभागाला तब्बल 14 कोटींचे विक्रमी उत्पन्न
आज कित्येक दिवस या सुविधेचा प्रश्न आवासून समोर उभा असताना डोळेझाक नेमके करतोय कोण ?असा सवाल प्रवाशातून केला जातो आहे.
हिरकणी कक्ष कुलूपबंद; स्तनदा मातांची गैरसोय
प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या स्थानकात हिरकणी कक्ष तयार करण्यात आले आहे. मात्र या खोलीलाही कुलूप असल्याने लहान बाळांना स्तनपान करताना सार्वजनिक ठिकाणी स्तनदा महिलाची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब येथील व्यवस्थापनाकडे अनेकदा मांडण्यात आली. मात्र त्यांच्याकडून आम्ही काय करणार , हा. आमचा विषय नाही हेच उत्तरे ऐकायला मिळतात. सबंधितांनी तत्काळ कुलुपबंद हिरकणी कक्ष खुला करुन देण्यात यावा. व उपहारगृहा चालू नसल्याने प्रवाशी जनतेची उपासमारी होत आहे हे सुद्धा ध्यानी घेऊन एसटी स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या मुहूर्ताची प्रतीक्षा न करता लवकरच स्थानक आवारात एसटी उपहारमूह सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.






