Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग; आग्नीतांडवात संपूर्ण इमारत जळून खाक

चिपळूण तालुक्यातील नागावे नदीपात्रालगत असलेल्या भंगार प्लास्टिकचा साठ्याचं मोठं गोडाऊन आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 21, 2026 | 07:19 PM
Ratnagiri News : प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग; आग्नीतांडवात संपूर्ण इमारत जळून खाक
Follow Us
Follow Us:

 

  • प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण अग्नीतांडव;
  • आगीत संपूर्ण इमारत जळून खाक
रत्नागिरी/ निसार शेख: चिपळूण तालुक्यातील नागावे नदीपात्रालगत असलेल्या भंगार प्लास्टिकचा साठ्याचं मोठं गोडाऊन आहे. या गोडाऊनला अचानक लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण इमारत भस्मसात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या इमारतीत काम करत असलेल्या सहा कामगारांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडून आपला जीव वाचवला. ही घटना सायंकाळी साधारण 4 वाजताच्या सुमारास घडली. नेमकी ही आग लागली तरी कशी याचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी वणव्यामुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालांडे नामक एका व्यवसायिकाची नागावे येथे डबर-खडी क्रशर होती. ती बंद पडल्यानंतर ती जागा त्यांनी एका भंगार व्यवसायिकाला भाडेतत्वावर दिली होती. संबंधित ठिकाणी भंगार प्लास्टिक पिशव्या धुवून व सुकवून त्यापासून कच्चा माल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. सुमारे तीन ट्रक इतका मोठा प्लास्टिक साठा येथे होता. दरम्यान, इमारतीलगत गवत शेतीकामासाठी पेटवण्यात आले होते. कडक उन्हामुळे ही आग वेगाने पसरत जाऊन प्लास्टिक साठ्यापर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळेच ही आग वणव्यामुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ratnagiri News : चिपळूणची जीवनवाहिनी वाशिष्ठी प्रदूषित; केंद्रीय अहवालाने उडाली खळबळ

आग लागल्यानंतर जवळपास अर्धा तास उलटून गेला तरी पोलीस व अग्निशमन यंत्रणेला वेळेत कळवण्यात विलंब झाला असं स्थानिकांकडून सांगण्यात आले. त्यानंतर महाजेनको (MAHAGENCO) पोफळी या जलविद्युत केंद्रातून अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीची तीव्रता इतकी होती की, त्यांच्याकडील पाणीसाठा अपुरा पडला. यामुळे आग विझवण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले. पाठोपाठ चिपळूण नगरपालिकेचा अग्निशमन बंबही दाखल झाला. त्यानंतर ही आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं.दरम्यान, आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की काही वेळातच संपूर्ण इमारत जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची पुढील चौकशी सुरू आहे.

Fire News: खेडमध्ये भीषण आगीत घर जळून खाक; तांबे कुटुंबावर आले मोठे संकट

Web Title: Ratnagiri newsmassive fire breaks out at plastic godown in chiplun entire building gutted in fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • Fire News
  • navrashtra news
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

औषध कंपनीच्या प्रयोगशाळेतच लागली आग; कॉम्प्युटर, एसीसह अनेक वस्तू जळून खाक
1

औषध कंपनीच्या प्रयोगशाळेतच लागली आग; कॉम्प्युटर, एसीसह अनेक वस्तू जळून खाक

Ratnagiri :रत्नागिरीत पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचे लोकार्पण
2

Ratnagiri :रत्नागिरीत पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.